सँडविच ब्रेड (bread recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#goldenapron3 #week16 #ingredient- #Bread
सध्या आमच्याकडे पाव,ब्रेड असे बेकरी पदार्थ अजिबात मिळत नाहीत मग मधे एक दिवस नो इस्ट ब्रेड बनवला पण आता लेकीला नेहमीचा सँडविच ब्रेड हवा होता मग काय पर्याय😊 #Bread #ब्रेड

सँडविच ब्रेड (bread recipe in marathi)

#goldenapron3 #week16 #ingredient- #Bread
सध्या आमच्याकडे पाव,ब्रेड असे बेकरी पदार्थ अजिबात मिळत नाहीत मग मधे एक दिवस नो इस्ट ब्रेड बनवला पण आता लेकीला नेहमीचा सँडविच ब्रेड हवा होता मग काय पर्याय😊 #Bread #ब्रेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ १/२ तास
  1. 1 (1/2 कप)मैदा
  2. 1 टीस्पूनमीठ
  3. 1 टेबलस्पूनमिल्क पावडर
  4. 1/4 कपकोमट पाणी
  5. 1 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनड्राय यीस्ट
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 2 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

१ १/२ तास
  1. 1

    सर्वात आधी १/४ कप पाणी कोमट करून त्यात साखर घालून मीक्स करून यीस्ट घालून १० मिनिटे झाकून ठेवावे.आता एका मोठ्या प्लेटमधे मैदा,मीठ व मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता यीस्ट अँक्टीव्हेट होऊन डबल झालेले असेल. फुडप्रोसेसर मधे मैद्याचे तयार मिश्रण घालून हळुहळु यीस्ट चे मिश्रण घालून डोव्ह तयार करून घ्यावा.(शक्यतो वरून पाणी वापरु नये.गरज वाटलीच तर कोमट पाणी घालावे)तयार पीठावर तेल घालून मळुन घ्यावे.

  3. 3

    आता एका मोठ्या भांड्याला तेलाचा हात लावून तयार पीठ व्यवस्थित गोल आकार देऊन वरून तेल लावून १तास प्रुव्ह व्हायला ठेवावे.
    १तासाने पीठ डबल झालेले असेल

  4. 4

    पीठ नाँक करून त्यातील हवा काढुन व्यवस्थित मळून घ्यावे व ते पोळपाटावर गोल पसरवून पींच अँन्ड फोल्ड पद्धतीने फोल्ड करून शेवटच्या कडा नीट सील करून ब्रेड बाँक्सला तेल लावून त्यात परत ४० मिनिटे प्रुव्ह करायला ठेवावे. पीठ परत डबल साइज होइल

  5. 5

    आता प्रीहीट ओव्हनमधे २१०℃ वर १५/२० मिनिटे बेक करून नंतर टेम्परेचर २००℃ करून परत १५/२०मिनिटे बेक करून घ्यावे. ब्रेड तयार आहे.तयार ब्रेड लगेच ब्रेड बाँक्समधुन बाहेर काढून त्यावर बटर लावावे ज्यामुळे ब्रेड साँफ्ट राहातो. बटर लावून ब्रेड मसलीन क्लाँथ घालून १० मिनिटे झाकुन ठेवावा. १०मिनिटांनी ब्रेड खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes