दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi)

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#आई
दुधी म्हटल्यावर लगेच आठवतो तो हलवा. पण माझ्या माहेरी कोहळा खात नसल्याने आईसाठी बनवलेली ही पाककृती. सासरी वाडीत दुधीची लागवड केली जाते, तेव्हा कधी एखादा दुधी बाजूला राहिल्यामुळे जून होत असे. तेव्हा या जून दुधीचा पेठा करता येईल का ? असा मनात विचार आला आणि हा पदार्थ तयार झाला. माझ्या आईला नवनविन पदार्थ बनविण्याची आवड असल्याने हा पदार्थ तिला आणि माझ्या सासूबाईंना समर्पित !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोजरा जून झालेला दुधी, शक्यतो मोठा घ्यावा, म्हणजे त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते
  2. 1/4 किलोसाखर
  3. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  4. 5-6बदाम
  5. 5-6पिस्ता
  6. 10-12केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

  1. 1

    दुधी घेताना जरा मोठाच बघून घ्यावा, किंवा दोन दिवस तसाच ठेवावा, म्हणजे आतील पाणी सुकून जाईल. दुधी सोलून, आतील बिया काढून त्याचे मोठे तुकडे करावेत.

  2. 2

    तुकडे मोठेच ठेवावेत, नाहीतर शिजून मऊ होतील. चाळणीवर ठेवून हे तुकडे दहा मिनिटे वाफवून घ्यावे. या वाफवलेल्या दुध्याचे मोठे 2 इंचाचे चौकोनी तुकडे करावेत. या तुकड्यांना टूथपिकने टोचून घ्यावे.

  3. 3

    पॅनमध्ये किंवा पसरट भांड्यात साखर घेऊन साखरेच्या अर्धे पाणी घालून गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की त्यात अर्ध्या केशराच्या काड्या व वेलचीपूड घालून दोन मिनिटे पाक उकळवावा.

  4. 4

    पाकात टोचलेले दुधीचे तुकडे नीट पसरवून लावावे. गॅस मंद करून पाच मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. पाच मिनिटांनी तुकडे उलटे करून पुन्हा झाकण ठेवून शिजवावे. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूने दुधीने पाक शोषल्यावर ते तुकडे ताटात काढून दुसरे तुकडेही असेच पाकात शिजवून घ्यावे.

  5. 5

    सर्व तुकडे शिजल्यावर वरून बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवावे. गरम - थंड कसेही खायला द्यावे. पण थंडच छान लागतात. मग करणार ना दुधीचा पेठा ?

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes