कोलंबी बिर्याणी

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#फॅमिली
माझ्या फॅमिली मधे सगळेच खवय्ये आहोत. पण प्रत्येकाची आवडनिवड वेगळी आहे. मला तर जास्त व्हेजच खायला आवडतं. पण माझ्या फॅमिली मधले पक्के नाॅनव्हेज खाऊ आहेत‌. मी क्वचितच खावंसं वाटलं तर खाते, पण मला फॅमिली साठी त्यांना खावंसं वाटेल तेव्हा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवून खायला घालायला फार आवडतं. फिश खाण्याच्या बाबतीत मात्र खूप वेळा सगळ्यांची आवड एक होते. त्यातून फिश म्हटलं की पहिली पसंती कोलंबीच असते. कोलंबी पासून मी खूप वेगवेगळे प्रकार बनवत असते. कधी फक्त कोलंबी फ्राय तर कधी कोलंबीची आमटी, कधी कोलंबी मसाला, कोलंबी बिर्याणी इत्यादी. आज बरेच दिवसांनी कोलंबी मिळाली. पण ती साफ करण्यातच खूप वेळ गेला, आणि भुकेची वेळ जवळ येत होती. तेव्हा अगदी झटपट तयार होणारी आणि मस्त चटकदार अशी कोलंबी बिर्याणी बनवली.‌ छान चमचमीत बिर्याणी खाऊन घरचे अगदी तृप्त झाले याचे समाधान वाटले. त्याच कोलंबी बिर्याणीची कृती देत आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २५० ग्रॅम कोलंबी
  2. ३०० ग्रॅम तांदूळ
  3. 3कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 2बटाटे
  6. 2 टीस्पूनतिखट पूड
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनधणे-जिरे पूड
  9. 2 टीस्पूनगरम मसाला पावडर
  10. 2 टीस्पूनआलं-लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
  11. 2 टीस्पूनमीठ
  12. 2 टेबलस्पूनदही
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. 2 टीस्पूनतूप
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. 1 टेबलस्पूनपुदिन्याची पाने
  17. 3तमालपत्र
  18. 2हिरवी वेलची
  19. 5लवंग
  20. 1/2 टीस्पूनमीरे
  21. 1 टीस्पूनकेशर घातलेलं पाणी
  22. ५०० मिली लिटर साधं पाणी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कोलंबी धुवून त्यातील काळा दोरा काढून परत स्वच्छ धुवून घेतली. त्यात हळद, तिखट, धणे-जिरे पूड, मीठ, गरम मसाला, आलं-लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घालून मॅरीनेट करायला ठेवले.

  2. 2

    कांदे, टोमॅटो आणि बटाटे चिरुन घेतले.

  3. 3

    कुकर मधे तेलात बारीक चिरलेला कांदा घालून परतला मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून त्यात तिखट पूड घालून परतून त्यावर मॅरीनेट केलेली कोलंबी आणि बटाट्याच्या फोडी घालून परतून त्यात दही घालून चांगले मिक्स केले.

  4. 4

    मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालून परतून त्यात धुतलेले तांदूळ घालून परतले.

  5. 5

    तांदूळ परतून त्यात केशर घाललेले पाणी आणि साधं पाणी आणि २ टीस्पून तूप घालून बिर्याणी शिजवून घेतली.

  6. 6

    माझ्या फॉमिलीची आवडती गरमागरम कोलंबी बिर्याणी सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes