मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#goldenapron3 week 17
सध्या आंब्याचा सीझन सुरु झाला आहे पण तरीही बाहेर जाऊन काही गरजेच्या वस्तूंच्या शिवाय इतर काही आणण्यासाठी घरापासून लांब जायला मिळतं नाही म्हणून जवळच एका फळवाल्याकडे सहा आंबे बरे मिळाले तेवढेच आणले. नेहमी इतरांसाठी त्यांच्या आवडीचे बनवत असते. तर यावेळी मला मॅंगो मिल्कशेक फार आवडतो मग तोच बनवला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

८ मिनिटे
एक
  1. 1आंबा
  2. १५० मिली लिटर दूध
  3. 1 टीस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनकाजू बदाम तूकडे

कुकिंग सूचना

८ मिनिटे
  1. 1

    एक आंबा स्वच्छ धुवून तो कट करुन घेतला. आणि त्याची सालं काढून बारीक तुकडे करुन मिक्सर मधून पल्प करुन घेतला.

  2. 2

    आंब्याच्या पल्पमधे एक चमचा साखर घालून परत मिक्सर मधून फिरवून मग त्यात एक कप थंड दूध घालून मिल्कशेक बनवला.

  3. 3

    एका ग्लासमधे मिल्कशेक घालून त्यावर आंब्याचे लहान तूकडे आणि काजू बदामचे तूकडे घालून सजवले आणि मी मॅंगो मिल्कशेकचा मस्तपैकी आस्वाद घेतला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes