कुरकुरीत भेंडी (KURKURIT BHENDI RECIPE IN MARATHI)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

चिरायला आणि तयार करायला जेवढा वेळ लागतो यापेक्षा वेगाने हा पदार्थ संपतो ..

कुरकुरीत भेंडी (KURKURIT BHENDI RECIPE IN MARATHI)

चिरायला आणि तयार करायला जेवढा वेळ लागतो यापेक्षा वेगाने हा पदार्थ संपतो ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
२/३
  1. 250 ग्रॅमभेंडी लांब व पातळ काप करून घ्यावे
  2. 1 टेबल स्पूनतांदळाचे पीठ
  3. 1 टेबल स्पूनबेसन
  4. 1 टेबल स्पूनदही
  5. 1 टिस्पून शेंगदाणा कुट
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1 टिस्पून तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टी स्पूनधने पावडर
  12. तळणासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम चिरलेल्या भेंडी चे काप एका पसरट भांड्यात घेऊन वरील साहित्यातील तेल वगळून सर्व साहित्य त्यावर घालावे

  2. 2

    हे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यावे व 5 मिनिट बाजूला ठेवावे

  3. 3

    कढईत तेल गरम करायला ठेवावे व हे मिश्रण एक-एक घाणा तळून घ्यावे आपली कुरकुरीत भेंडी खायला तयार आहे ही भेंडी स्नॅक्स म्हणून किंवा जेवणात तोंडीलावणे म्हणून उत्तम पर्याय आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (3)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
स्टार्टर म्हणून खूप छान आहे... 😋👌

Similar Recipes