तोंडले भात (tondle bhaat recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

रोज रोज काय वेगळ करायचं छान ताजी ताजी तोंडली मिळालीत मग काय केला बेत तोंडले भाताचा

तोंडले भात (tondle bhaat recipe in marathi)

रोज रोज काय वेगळ करायचं छान ताजी ताजी तोंडली मिळालीत मग काय केला बेत तोंडले भाताचा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
दोन
  1. 150 ग्रॅमतोंडले उभे चिरा दिलेले
  2. 150 ग्रॅमतांदूळ दूध धुतलेले
  3. 1 टेबल स्पूनतेल
  4. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनमोहरी जिरे
  6. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  7. 1 टीस्पूनदाणे मेथी
  8. 1 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टी स्पूनहळद
  10. 5 ते 6 हिरव्या मिरच्या लांब कापलेल्या
  11. 1 टिस्पून खोबरे कीस
  12. 2 टी स्पूनलिंबाचा रस
  13. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    वर दर्शवलेले सर्व साहित्य तयार ठेवल्यावर कढईत तेल गरम करायला ठेवावे व त्यामध्ये तोंडले तळुन घ्यावे

  2. 2

    तळलेले तोंडले एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये अर्धा गरम मसाला व अर्धे मीठ पसरवून मीठ मसाला मुरु द्यावा व कढईतल्या शिल्लक तेलामध्ये जिरे मोहरी मेथी दाण्याची फोडणी करून हिरवी मिरची, कसुरी मेथी, आले लसुण पेस्ट व हळद घातल्यावर तांदूळ ॲड करावे.हे तांदूळ तेलावर खमंग परतून घ्यावे. त्यानंतर कढईमध्ये दोन पेले गरम पाणी घालावे व शिल्लक मीठ व मसाला ॲड करावा, लिंबाचा रस घालावा व झाकण ठेवावे.

  3. 3

    लिंबाच्या रसामुळे भात मऊ शिजून तांदळाचा दाणा मोकळा होतो साधारण पाच मिनिटांनी झाकण उघडून बघावे तांदूळ शिजवण्याच्या मार्गावर आहे त्यावेळी मिठ मसाला लावलेली तोंडली ऍड करावी व तांदूळ तोंडली एकत्र करून पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण ठेवावे

  4. 4

    आता तोंडली भात शिजून तयार आहे सर्व्ह करताना कोथिंबीर व खोबरे कीस घालून प्लेट तयार करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (5)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
#cooksnap .नमस्कार ताई, तुमची ही रेसिपी मी काल केली होती. खूप छान झाली होती . घरात सर्वांना आवडली.

Similar Recipes