अंडा बिर्याणी 🥚🍚(aanda biryani recipe in marathi)

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#बिर्याणी आज मी स्पेशल पण झटपट आणि चविष्ट अंडा बिर्याणी केली आहे बिर्याणी हा बेत मला फारच आवडतो मग ती बिर्याणी कोणत्याही प्रकारची आणि पद्धतीची असो 🤷🏻‍♀️

अंडा बिर्याणी 🥚🍚(aanda biryani recipe in marathi)

#बिर्याणी आज मी स्पेशल पण झटपट आणि चविष्ट अंडा बिर्याणी केली आहे बिर्याणी हा बेत मला फारच आवडतो मग ती बिर्याणी कोणत्याही प्रकारची आणि पद्धतीची असो 🤷🏻‍♀️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण दीड तास
४ जणांसाठी
  1. 6-7उकडलेली अंडी
  2. 1 किलोबासमती तांदुळ
  3. ५०० ग्रॅम घट्ट दही
  4. 4-5कांदे बरिष्ता साठी तळलेला
  5. 2तमालपत्र
  6. 2-3काळी मिरी
  7. 3-4लवंग
  8. 1चक्रिफुल
  9. 1 छोटादालचिनी तुकडा
  10. 1लालबुंद टोमॅटो
  11. 1 टेबल स्पूनगरम मसाला पावडर
  12. 1/2 टी स्पूनधना पावडर
  13. 1/2 टी स्पूनजिर पावडर
  14. 1/2 टी स्पूनलाल मिरची पावडर
  15. 2 टी स्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  16. १वाटी ताजा पुदिना पाने
  17. 1 वाटीताजी कोथिंबीर
  18. 6-7तळलेले काजू (ऑप्शन)
  19. 1 टी स्पूनबिर्याणी मसाला
  20. चवीनुसारमीठ
  21. गरजेनुसार पाणी (तांदूळ शिजविण्यासाठी)
  22. 2हिरव्या मिरच्या
  23. 2 टी स्पूनआले लसूण पेस्ट
  24. 1/2 टी स्पूनहळद
  25. 1 टी स्पूनकसुरी मेथी
  26. 1 कपसाजूक तूप
  27. 1 छोटालिंबू
  28. 1 पिंचखाण्याचा कोणताही रंग

कुकिंग सूचना

साधारण दीड तास
  1. 1

    सर्वप्रथम अंडी उकळत्या पाण्यात उकडून घ्यावे...अंडी उकडताना त्या पाण्यात किंचित मीठ घातल्यास अंडी लवकरात लवकर उकडायला मदत होते.....

  2. 2

    तोपर्यंत अंडी शिजेपर्यंत म्यारेनेशन साठी बाऊल मध्ये, फेटून घेतलेले दही त्यात गरम मसाला,धना पावडर, बिर्याणी मसाला, कोथिंबीर पाने, पुदिना पाने, आलें लसूण पेस्ट, कसुरी मेथी, तळलेला कुरकुरीत कांदा, हळद, मीठ, अर्धा लिंबू रस, कश्मिरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हे सर्व मसाले एकत्र मिक्स करावे....

  3. 3

    आता मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा...पाणी तुमच्या तांदूळ असेल त्या दुपट्ट असावे नेहमी.... पाणी उकळले की, त्यात खडा मसाला घालावा म्हणजेच, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, चक्रिफुल, दालचिनी, त्यातच थोडे मीठ, साजूक तूप, आणि आपले बासमती तांदुळ घालावे.... उकळी आली की त्यात लिंबू रस पिळावा....यामुळे तांदूळ स्वच्छ पांढराशुभ्र होतो आणि मोकळा होतो.... अंडा बिर्याणी साठी भात आपला ९०% शिजवून घ्यावा👍🏼

  4. 4

    तोपर्यंत अंडी उकडून झाल्यास त्याची टरफले काढून त्यावर टोचे मारून घ्या....आणि आपल्या म्यारेनेशन चे मसाल्यात अंडी ठेऊन अर्धा तास मुरायला ठेवा...

  5. 5

    आता बिर्याणी भांड्यात खाली तूप सोडून त्यात भाताची आणि म्यारेनेशान केलेले अंड्याची लेयर लावावी....अधून मधून कोथिंबीर पुदिना तळलेला कांदा याची ही लेयर द्यावी...आणि वरून साजूक तूप पुन्हा घालावे....अधून मधून आवडत असल्यास खायचा रंग किंवा केशर पाणी घालावे....👍🏼

  6. 6

    भात वाफेवर शिजवून घ्यावा साईड ने त्याला सिल करावे.... आणि मंद आचेवर अंडा बिर्याणी शिजवून घ्यावी. आता त्यावर साजूक तूप आणि कोळसा किंवा नारळाची करंटी जाळून छान स्मोक द्यावा...बिर्याणी तयार झाल्यास त्यावर काजू कोथिंबीर उकडलेली अंडी पुदिना तळलेला कांदा घालून सोबत कोशिंबीर आणि मठ्ठा सोबत सर्व्ह करावे....

  7. 7

    आपली अंडा बिर्याणी तयार 👍🏼💯

  8. 8

    तयार अंडा बिर्याणी खाण्यास तयार व्हा 🤷🏻‍♀️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

Similar Recipes