कढी वडा (kadhi vada recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1
माझा आवडता पदार्थ 2 कढी वडा आईच्या हातचा खूप आवडतो. आईकडे गेले की आई अगदी आवर्जून करते.
कढी वडा (kadhi vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1
माझा आवडता पदार्थ 2 कढी वडा आईच्या हातचा खूप आवडतो. आईकडे गेले की आई अगदी आवर्जून करते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ताकाची कढी करून घेऊयात,कढईत तेल टाकून मोहरी,जिरे,कढीपत्ताची फोडणी द्यावी मग त्यात वाटण (ओले खोबरे,लसूण,हिरवी मिरची,अद्रक,हळद) चांगले परतावे.
- 2
दह्याचे ताक करून त्यात बेसन पीठ मिक्स करुन कढईत ओतावे,मीठ व कोथिंबीर टाकून बारीक गॅसवर 10 मिनिटे ठेवावे,कढीला उकळी येऊ द्यायची नाही,कढी तयार.
- 3
वड्यासाठी बटाटे उकडून घ्यावे,कढईत थोडे तेल टाकून मोहरी व कढीपत्ताची फोडणी दिली. त्यात वाटण (लसूण,हिरवी मिरची,अद्रक,हळद,ओवा) चांगले परतून घ्यावे,बटाटे स्मॅश करून टाकावे,मीठ टाकून चांगले परतून थंड झाल्यावर वडे बनवावे.
- 4
बेसन पीठात हळद,मीठ,सोडा,पाणी टाकून चांगले मिक्स करून,त्यात बनवलेले वडे बुडवून तेलात तळून घ्यावे.
- 5
कढीत वडा टाकून खावा, सोबत पाव व लसणाची लाल चटणी,खूप मजा येते खायला. 😋
Similar Recipes
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडा पाववडा पाव हा असा पदार्थ आहे की जो सर्व सामान्य लोकांचे पोट भरतो.2 वडा पाव खाल्ले की पोट भरत.हा असा पदार्थ आहे अगदी लहान मुलं ते वयोवृद्ध सगळ्यांना खूप आवडतो.बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने अगदी रुचकर वडे करतात.त्या वाड्याची लज्जत वाढवायला हिरवी मिरची आणि लाल चटणी तर हवीच.त्या शिवाय मज्जाच नाही.त्यात एकतर खूप पाऊस किंवा खूप थंडी आणि त्या बरोबर चहा ... आहाहा.... Sampada Shrungarpure -
कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
#cooksnap शामल वाळुंज यांची ही रेसिपी केली आहे. बटाटा वडे वरचेवर होतच असतात पण कढी वडा पाव पहिल्यांदाच केला Reshma Sachin Durgude -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr कढी चावल म्हणजे कढी भात होय.माझ्या आवडीचा पदार्थ. सोबत भजी केली की,खूप छान. पण आज मी फक्त कढी भात केला आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #Themeआवडती रेसिपी साबुदाणा वडा खायला सर्वांना खूप आवडतो सुट्टीच्या दिवशी घरात सर्वजण असल्यावर काहीतरी चमचमीत खायचे म्हटल्यावर साबुदाणा वडा नक्की बनणार........ Najnin Khan -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4#week 7बटाटा वडा माझा वीक पॉईंट. लहानपणी आई वाढदिवसाला हमखास माझ्या आवडीचे वडे करायची. तेव्हा केक वगैरे नसायचा.घरातील सर्वाचा अतिशय प्रिय. एनीटाईमखायला तयार असतात सगळे जण बटाटा वडा. Shama Mangale -
पकोडेवाले कढी चावल (pakode wale kadhi chawal recipe in marathi)
#crकधी कधी वरणभात खाऊन खूप कंटाळा येतो . तेव्हा आमच्या घरी कढी पकोडेचा बेत हमखास केला जातो.अगदी पोटभरीचा आणि माझा खूप आवडता मेनू...☺️पाहूयात रेसिपी..☺️ Deepti Padiyar -
मुंबई स्टाईल वडा पाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्वडा पाव म्हंटले की, आठवते मुंबई - पुणे ची गर्दी. तिथल्या धावपळीच्या जीवनात वडा पाव हा अगदी सगळ्यांच्या जवळचा (आवडता) कधी होतो कळतही नाही. जेवढं सोपा बनवायला आहे तेवढ्याच सोपा खायला सुद्धा. आणि महाराष्ट्रात आल्यावर वडा पाव खाल्ला नाही असं होत नाही. म्हणूनच आज ही रेसिपी शेअर करते आहे.Asha Ronghe
-
कढी (kadhi recipe in marathi)
सुट्टी दिवशी सकाळी नाष्टा केला नंतर दुपारी जेवण बनवायचा कंटाळा आला की झटपट मेनू काय तर कढी भात...😋.... भूक नसेल तरी मी थोडा खाईन कढी भात.....तर मी तुम्हाला कढी ची रेसिपी दाखवणार आहे.... जीरे मोहरी लसणाची कुणी बुक कढी बुक कढी... Smita Kiran Patil -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाडाळ वडा मी लहान असताना आजोबा कडे गेले कि ते आम्हाला मुलांसाठी घेऊन येत असत. तेव्हा असं वाटायचं की हे पदार्थ बाहेरच मिळतातं. नंतर मग आई करायची, आणि आता मी पण करते. Shilpa Ravindra Kulkarni -
कोल्हापूरचा बटाटे वडा (batate vada recipe in marathi)
#KS2 जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे वाक्य तुम्ही ऐकलं असेलच त्याप्रमाणेच इथले लोक व संस्कृती आहे.तसेच इथे कलेचा पूर्ण मान सन्मान होतो व खाद्यपदार्थ ची पुरेपूर वाहवा होते .असे आमच्या कोल्हापूरचे लोक खाण्यात खूप शौकीन असतात ,म्हणूनच इथे पोहे ,उप्पीट, शिरा ,खीचडी सोबतच मिसळ,वडा,कटवडा, इडली ,आंबोली, डोसा हे पदार्थ देखिल सकाळच्या नाश्त्याला खाल्ले जातात .पोटभर चमचमीत ,झणझणीत नाश्ता लागतो तिथे लोकांना म्हणूनच कोल्हापूरचा प्रसिद्ध बटाटे वडा मी आज कसा केला ते सांगते, कोल्हापूर ला बटाटे वडा मोठ्या आकारात केला जातो व तो लादीपाव सोबत न खाता साध्या पवासोबत खाल्ला जातो. Pooja Katake Vyas -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#वडा_पाववडा पाव हा पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हातगाडी ते मोठ्या हाॅटेलमध्ये हा वडा पाव सहजपणे मिळतो. गरीबांचा हा बर्गर म्हणून ओळखला जातो.प्रत्येक भागात तो आपल्या विशेष पद्धतीने बनवला जातो ..चला तर बघू या वडापाव ची रेसिपी 😊 जान्हवी आबनावे -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टखिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात. Supriya Devkar -
-
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कढी चावलकधीतरी जेवणामध्ये हलकसं काहीतरी हवं असतं किंवा मध्ये काहीतरी खाणं झाल्याने काहीतरी हलकं फुलकं खावेसे वाटते. अशावेळीसुद्धा आपल्या मदतीला अनेक पदार्थ धावून येतात. त्यापैकीच एक म्हणजे कढी चावल.आणि ऊन्हाळ्यात तर कढी, ताक हे पदार्थ आवर्जून खावेत, कारण त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो, ऊष्णतेमुळे होणारे त्रासही कमी होतात. म्हणूनच तुओमच्यासाठी माझी ही आजची रेसिपी, कढी चावल. Namita Patil -
वडा पाव (vada pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स # वडापाव# मुंबईचा, नव्हे आता संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता पदार्थ... Varsha Ingole Bele -
शेंगुळी (shengooli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझा आवडता पदार्थ १मला शेंगुळी खूप आवडते,अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ आणि आईच्या हातची शेंगूळी जगात भारी...मला आई इतकी छान येत नाही,पण प्रयत्न केला,आई सारखी नाही झाली. पण आवडीचा पदार्थ असल्यामुळे सपाटून जेवले😋 shamal walunj -
कढी भजे (kadhi bhaje recipe in marathi)
#आईमी बघितले आहे आई सणासुदीचा स्वयंपाक करायची स्व्यांपकात अगदी सुगरण अशी माझी आई, तिला काय आवडत असेल हे मी कधी विचारलेच नाही , पण आज मी कढी भजे बनवले आहे ते मला आठवत की आई जेव्हा सर्वांचे जेवणं झाल्या नंतर शेवटी जेवायला बसायची तर कढी भजे आवडीने खायची मानून आज आई साठी मला कढी भजे बनवायची इच्छा झाली.आई मला नेहमी एका अन्नपूर्णे च्या रूपातच दिसली , नेहमी काही न काही करत असायची,सर्वच पदार्थ खूप मनापासून आणि मस्त बनवायची बोले तो आपून ने की मा सर्व गुण संपन्न स्वयंपाकात मी आई इतकी सुंदर पवाकंन बनवणारी बाई बघीतली च नाही दिवाळी च फराळ असो सणासुदीचा स्वयंपाक असो किव कितीही पाहुणे असो नेहमी समाधानी नेहमी आम्हा बहिणी च्या पाठीशी राहणारी बळकट दणकट खांदा देणारी कुठल्या ही परिस्थीती ला न डगमग्णारी नेहमी मला आईचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मी विचार करायची आई कधी थकत नाही का ? वा ,आयुष्यात खूप वाईट परिस्थिती ला पण ना घाबरणारी अशी माझी आई , आम्हाला महणायची काहीही झाले तरी शिकायचे कधीही सोडायचे नाही , आमची आई एक मैत्रीण पण होती आमची , स्वतः भरत काम करायची स्वेटर विणयची, क्रोशिया आणि काय काय ती करायची , दर दिवाळी ला घरी येवुन आम्हा दोघी बहिणी कडे दिवाळी चा फराळ तीच करून द्यायची , वर्ष भराचे हळद ,तिखट मसाला पापड सर्व तीच करून द्यायची , पण आता आई गेली आणि आम्ही सर्वच कामाला मुकलो , बस आता आई आठवणीत असते नेहमी....🙏 Maya Bawane Damai -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8सर्वांचा लाडका, कधीही, कुठेही, केव्हाही हवाहवासा वाटणारा सगळ्यांचा आवडता असा हा बटाटा वडा! पावाच्या सोबतीने झाला गरीबांचे अन्न. कमी किंमतीमुळे परवडणारा वडापाव भूकेल्या पोटाचा आधार वड!!! Manisha Shete - Vispute -
-
कढी पत्रवडे (kadhi patravade recipe in marathi)
#cooksnapकढी पत्रवडे ही खुप छान रेसिपी मी कामत अँड गौखले फुड्स यांची कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसिपी आहे.मी यात थोडा बदल करुन ही रेसिपी केली आहे.नारळाच्या दुधाची कढी न करता साधी ताकाची कढी आहे. Supriya Thengadi -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#कढीवैदर्भीय स्टाईल महाराष्ट्रीयन कढी ची रेसिपी. Ankita Khangar -
आंब्याची (कैरीची) कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#cooksnap आंब्याची कढी ही Suchita Ingole Lavhale Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. खूपच टेस्टी झालेली आहे, ताई कढी. Priya Lekurwale -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
-
-
कांद्यातील बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबाहेर मस्त पाऊस पडत आहे म्हणून भजी किंवा बटाटे वडे करायचा प्लान चालला होता तर मला एक नवीन आयडिया सुचली कांद्याच्या टोपणामध्ये बटाट्या वड्याचं सारण भरून बटाटेवडे करूया तर मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे कांद्यातील बटाटा वडा बाहेर मस्त पाऊस पडत आहे नक्की ट्राय करून बघा Smita Kiran Patil -
More Recipes
टिप्पण्या