आंबा शिरा (mango shira recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12-15 मिनीटे
5सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमजाड रवा
  2. 150 ग्रॅम साखर
  3. 150 ग्रॅमसाजूक तूप
  4. 250 मिली दूध
  5. 50मिली पाणी मिक्स
  6. 1मोठ्या आंब्याचा रस
  7. 1 टीस्पूनवेलचीपूड केशर

कुकिंग सूचना

12-15 मिनीटे
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात दूध आणि पाणी एकत्र करुन उकळण्यास ठेवा‌‌..यातच केशर घाला..एक उकळी आली की गॅस बंद करा..आंब्याचा रस काढून ठेवा..

  2. 2

    एका कढईत तूप घालून रवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा.नंतर यात आंबारस घालून व्यवस्थित परतून घ्या.आता या मिश्रणात उकळवलेले दूध घालून परत सर्व मिश्रण परतून घ्या.आणि चांगल्या ३-४ वेळा वाफा काढून घ्या..

  3. 3

    आता साखर घालून सर्व मिश्रण परत परतून घ्या..साखर विरघळली की त्यात वेलचीपूड घाला..परत एक वाफ काढा..खायला तयार आंबा शिरा..

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes