पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल.
नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते.
मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

૪૫ मिनट
૪ मेंबर्स
  1. गोळे बनविण्यासाठी साहित्य :
  2. १वाटी मूंग डाळ,
  3. 1 वाटीतूर डाळ
  4. 2 चमचाआले लसूण पेस्ट
  5. 1 लहान चमचा मिरची पेस्ट
  6. 1 चमचाहिंग
  7. 1 लहान चमचा हळद
  8. 1 लहान चमचा जिरे
  9. 1 लहान चमचा मेथी दाना
  10. चवीनुसारमीठ
  11. कढी बनविण्यासाठी साहित्य :
  12. 3 वाट्याआंबट दही
  13. 2 छोटे चमचे भरून चणापिठ
  14. फोडणीसाठी:
  15. २ चमचे तेल/तूप,
  16. 1 चमचामोहोरी
  17. 1 जिरे,
  18. ૮ -९ कढीपत्ता पाने
  19. 1/2 चमचाहिंग,
  20. 2लसूण पाकळ्या
  21. 1 चमचाहळद
  22. 2हिरव्या मिरच्या
  23. चवीनुसारमीठ
  24. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

૪૫ मिनट
  1. 1

    पद्धत १ :-
    १) मूंग डाळ आणि तूर डाळ एकत्र ५-६ तास भिजत घालावी. मूंग डाळ आणि तूर डाळ भिजली कि थोडावेळ ती निथळत ठेवावी. त्यातील पाणी निघून गेले कि त्यात आले लसूण पेस्ट, मिरचीपेस्ट, हिंग, हळद, जिरे, मीठ, कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. मिक्सरमध्ये मिश्रण वाटताना पाणी घालू नये नाहीतर गोळे एकसंध राहणार नाहीत. या मिश्रणाचे एक इंचाचे घट्टा गोळे करून घ्यावे. आवश्यक तेवढा जोर देऊन गोळे घट्ट करावेत जेणेकरून ते कढीत फुटणार नाहीत.

  2. 2

    २)दह्याचे पातळसर ताक करून घ्यावे. त्यात चणापिठ गुठळी न राहता मिक्स करावे. पातेल्यात तूप किंवा तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मेथी दाना घालून फोडणी करावी. मिरच्यांचे तुकडे घालावे. जर लसूण आवडत असेल तर ५ लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्यात ताक घालावे. आणि मध्यम आचेवर उकळी येईस्तोवर ढवळत राहावे. चवीपुरते मिठ घाला.

  3. 3

    ३) कढीला उकळी आली कि आधी एक गोळा कढीत घालून बघावा जर तो फुटला नाही तर एक एक करून हळू हळू गोळे आत सोडावेत. शेवटचा गोळा घातल्यानंतर ५ मिनीटे कढीत शिजू द्यावेत. गरम गरम खायला घ्यावेत.

  4. 4

    विदर्भात काही ठिकाणी कढीत भजी टाकण्याचीही पध्दत आहे, मात्र कढी उकळताना त्यात भजी टाकण्याऐवजी ती ताटात कढी वाढल्यावर गरमागरम भजी करुन कढीच्या वाटीत सोडली जातात. यामुळे कढीची चव मिळतेच, पण भज्यांचा कुरकुरीत पणाही कायम राहातो.हे गोळे किंवा पकोडे भातासोबत, पोळी किंवा भाकरीसोबत फारच छान लागतात.

  5. 5

    पद्धत २:-
    कृती : भिजलेली डाळ मिक्सरवर जाडसर वाटावी. त्यामध्ये वाटतानाच आले, लसूण, मिरची, मीठ, जिरे घालावे. आपल्या चवीनुसार वरून हळद घालावी. वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोळे वळावेत. तयार गोळे चाळणीला तेल लावून अथवा कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ठेवून वाफवावे अथवा प्रेशरकुक करावेत. जेवणापूर्वी गोळे कढीत सोडावे व गरम करावे. वरून चिरून कोथिंबिरीने सजवावे.

  6. 6

    टीप:
    कढी बनवताना थोडी जास्त बनवावी कारण गोळे घातल्यावर गोळे कढी शोषून घेतात. गोळे जर बनत नसतील तर त्यात बेसन घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

Similar Recipes