बटाट्याचा शिरा (batatyacha shira recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक#week3
#नैवेद्य
एकादशीला सर्व जण उपवास करतात, उपवास हा फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून करतात असे नाही तर प्राचीन संस्कृतीपासून आपल्या पूर्वजांनी उपवासाचे शास्ञीय कारणे सांगितले आहेत.लंघन करणे हा त्यातलाच प्रकार.
उपवासाच्या दिवशी पोटाला म्हणजे सर्व पचनेंद्रीयांना आराम मिळावा हा त्या मागचा मुख्य उद्देश असावा आणि त्याला भक्तीची जोड दिल्याने आपसूकच लोकं ते कटाकक्षाने पाळतात.
पण बरेचदा "एकादशी अन् दुप्पट खाशी" या म्हणी प्रमाणे वेगवेगळे पदार्थ केले जातात.परंतू उपवासाला कंदमुळांचे महत्वही तितकेच प्रामुख्याने जाणवते कारण चातूर्मासात पौष्टीक सत्व हे कंदमुळांमधूनच मिळतात जसे कि रताळे,बटाटे वगैरे.आज आपण या पविञ व भक्तीमय एकादशीच्या उपवासासाठी सात्विक बटाट्याचा शिरा हा नैवेद्य मी या देवशयनी एकादशीला करणार आहे
*"एकादशी यंदाची,रेसिपी बटाट्यांची"*
चला तर मग लागूया तयारीला...
यंदाच्या एकादशीला विठूरायाच्या चरणी साकडे घालूया की या कोरोना वैश्विक रोगाचे संकट लवकरात लवकर दूर होवू दे...
*रामकृष्णहरी...पांडूरंग हरी...विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल*

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 3 1/2 टेबलस्पूनसाखर
  3. 4 टीस्पूनदुध व साय
  4. 1/2 टेबलस्पूनबारिक चिरलेले बदाम,पिस्ता,काजू
  5. 1/2 टीस्पूनकिसमिस
  6. 2 टीस्पूनसाजुक तुप
  7. 1/2 टीस्पूनइलायची पावडर
  8. 4-5केसर काड्या

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    उकडलेले बटाटे किसुन घ्या. पॅन मधे तुप घेउन त्यात काजू बदाम पिस्ता व किसमिस घालुन परता व लगेच किसलेला बटाटा घालुन चांगले दहा ते बारा मिनिटे खमंग परतावे.

  2. 2

    खमंग परतल्या नंतर त्यात इलायची पावडर घालावी व साय असलेले दुध घालावे, व दोन मिनिट झाकुन वाफ आणावी व मग साखर घालून छान मिसळावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी व गैस बन्द करावा. थंड झाले की शिरा बाउल मधे काढुन ड्राई फ्रुट नी सजवून आधी देवाला नैवेद्य दाखवावा व मग पानात वाढावा.. बटाट्याचा शिरा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes