चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
रेसिपी नं 15
मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 250 ग्रॅमचवळी शेंगा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 8 ते 10 कढीपत्ता
  5. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पुनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनजीरे, हळद, हिंग प्रत्येकी
  8. 2 ते 3 टेबलस्पुन फोडणी साठी तेल
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम कढई मध्ये 1 टेबलस्पुन तेल घालून शेंगा छान परतून घ्या व चवीनुसार मीठ घालून शेंगा छान शिजवुन घ्या.

  2. 2

    आता त्याच कढईत फोडणी साठी तेल घाला व छान गरम झाले कि त्यात हिंग, जीरे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता छान परतुन घ्या.व मऊ होईपर्यंत छान शिजवुन घ्या.

  3. 3

    आता मसाले घाला आणि छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत फ्राय करा.

  4. 4

    मसाला छान फ्राय करून झाला की त्यात शिजवलेल्या चवळी च्या शेंगा घाला मस्त परतुन घ्या

  5. 5

    आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला व चवीनुसार मीठ घालून एक उकळी येऊ द्या.

  6. 6

    कोशिंबीर भुरभुरून सर्व्ह करा मस्त झणझणीत चवळी च्या शेंगांची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes