खान्देशी चिकन रस्सा (khandeshi chicken rassa recipe in marathi)

Tejashree Jagtap
Tejashree Jagtap @cook_24883861

खान्देशी चिकन रस्सा (khandeshi chicken rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोचिकन
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1/2टिस्पून हळद
  4. मसाल्यासाठी
  5. 4कांदे
  6. 8/9लाल मिरच्या
  7. 100 ग्रम सूके खोबर
  8. 1/2 टिस्पून खसखस
  9. 3-4काळी मिरी
  10. 3-4बारीक तुकडे दालचिनी
  11. 2-3लवंग
  12. 1बारीक तमालपञ
  13. 7-8 टेबलस्पूनतेल
  14. कोथिंबीर
  15. 4 टेबलस्पूनकांदालसूण मसाला
  16. 4 टेबलस्पूनचिकन मसाला
  17. 4-5लसुण पाकळ्या
  18. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम आपण खालील प्रमाणे पातेल्यात 2 टेबलस्पून तेल टाकुन, बारीक चिरलेला कांदा, 1/2 टिस्पून हळद टाकुन चिकन शिजवून घेणे.

  2. 2

    आता आपण ताजा मसाला बनवू. खाली दाखवलेले सर्व जिन्नस एका कढाईत छान खमंग लालसर भाजून घेऊ या आणि थंड झाले कि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या आणि मसाला बारीक वाटून झाल्यावर, कांदालसूण मसाला टाकून परत मिक्सरला फिरवून घ्या.

  3. 3

    आता पातेल्यात तेल तापवून घ्या, त्यामधे ऐक तमालपत्र टाका, नंतर वाटलेला मसाला छान तेल सुटे पर्यत परतून घ्या. त्यानंतर चिकन मसाला, चवी नुसार मीठ आणि शिजवलेले चिकन टाकून 10 मिनीट शिजवून घ्या. झाले आपले खान्देशी चिकन रस्सा तयार.

  4. 4

    टिप : जर रस्सा पातळ झाला असेल तर पंढरपुरी डाळ तव्यावर भाजुन मिक्सर मध्ये बारीक करून नंतर थोडे पाणी टाकुन रस्सा मध्ये टाकावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejashree Jagtap
Tejashree Jagtap @cook_24883861
रोजी

टिप्पण्या (2)

Santosh Sawant
Santosh Sawant @cook_25205321
Chicken shijavnyasathi pani kadhi, kiti vaparayache sangitale nahi

Similar Recipes