मोदकाची चंद्रकोर (Modakachi Chandrakor recipe in marathi)

Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757

मोदकाची चंद्रकोर (Modakachi Chandrakor recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३ सर्व्हींग्स
  1. १०० ग्रॅम ओल्या खोबर्याचा किस
  2. १०० ग्रॅम गुळ
  3. १०० ग्रॅम तांदुळाचे पिठ
  4. १०० मि. ला. पाणि
  5. 1 टेबलस्पुनखसखस
  6. 1/2 टीस्पूनवेलचीपुड
  7. चिमुटभरमीठ
  8. 2 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    पाण्यात तेल घालुन ऊकळायला ठेवा त्यात चिमुटभर मीठ घाला, पाणि चांगले ऊकळले कि त्यात तांदुळाचे पिठ घालुन चांगले ढवळून शिजवून घ्या. थोडे गरम असतानाच पाण्याचा हात लाऊन चांगले मऊसुत मळुन घ्या गरज वाटल्यास थोडे पाणि वापरा.

  2. 2

    गुळ किसून त्यात ओल खोबरेकिस वेलचीपुड आणि खसखस घालुन चांगले शिजवून घ्या थंड करायला ठेवा.

  3. 3

    मळलेल्या पिठाचे तेलाचा हात लावून २ पुर्या थापुन घ्या एका पुरीवर चंद्रकोरीच्या आकारात पुरण भरा वरुन दुसरी पुरी ठेवुन पाण्याच्या हाताने बंद करुन चंद्रकोरीच्या आकारात कापा

  4. 4

    अशा केलेल्या चंद्रकोरी कुकर मधे १५ मिनिटे वाफवून घ्या नंतर थोडे पाणि घालुन काढुन सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757
रोजी

Similar Recipes