पुरणाचे दिंड (purnache dinde recipe marathi)

Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679

#Shravanqueen
सुप्रियताईंची रेसिपी पाहिल्यावर लहानपणीची आठवण झाली, माझी आजी तेव्हा नागपंचमीला नेहमी पुरणाचे दिंड करायची. तेव्हा आम्ही सगळ्या मुली मिळून नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढायचो, आणि दुसऱ्या दिवशी छान आवरून बांगड्या घालून आजूबाजूच्या सर्व स्त्रिया आणि मुली मिळून खेळ खेळायचो, ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. आता खुप वर्षात दिंड केलेच नव्हते कूकपॅड च्या निमित्ताने करायला मिळाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीहरभरा डाळ
  2. 1 वाटीगुळ
  3. 2 चमचेसाखर
  4. वेलची पावडर
  5. 2 वाट्यागव्हाचे पीठ
  6. चिमूटभरहळद
  7. चिमुटभरसूंठ पावडर
  8. चिमूटभरकेशर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    हरभरा डाळ शिजवून घ्या, नंतर कढईत डाळ घेऊन त्यात गुळ, साखर, सुंठ पावडर, वेलची पावडर, केशर घालून चांगले परतून घ्या.

  2. 2

    तयार झाल्यावर पुरणाच्या चाळणीतुन चाळून घ्या. नेहमीप्रमाणे पोळ्यांच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्या. पुरीपेक्षा मोठी लाटी लाटून घेणे आणि त्यात पुरण भरून दिंड करून घ्या.

  3. 3

    झालेले दिंड उकडून घेणे. तुपासोबत सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes