क्रिमी टोमॅटो सूप

Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058

या सूप मध्ये टोमॅटोचे सुप वापरण्याचे कारण म्हणजे टोमॅटो हे रक्तवर्धक, विटामिन सी ने भरपूर असल्याने. आणि सर्वप्रथम सूप म्हटले की आपल्या डोळ्यासमोर टोमॅटो सूप च येते . टोमॅटो सूप लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. #सूप

क्रिमी टोमॅटो सूप

या सूप मध्ये टोमॅटोचे सुप वापरण्याचे कारण म्हणजे टोमॅटो हे रक्तवर्धक, विटामिन सी ने भरपूर असल्याने. आणि सर्वप्रथम सूप म्हटले की आपल्या डोळ्यासमोर टोमॅटो सूप च येते . टोमॅटो सूप लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. #सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटं
  1. 4टोमॅटो
  2. 4लसून पाकळ्या
  3. 4लवंग
  4. लाल तिखट
  5. मीठ
  6. साखर
  7. क्रीम
  8. कोथिंबीर
  9. 1 चमचाकॉर्नफ्लॉवर
  10. 1 चमचाबटर

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन कुकरला उकडवून घ्या. गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून गाळणीने त्याचा पल्प काढून घ्या

  2. 2

    फ्राईंग पॅनमध्ये बटर टाकून लसुन टेचुन टाका किंचित फ्राय झाल्यानंतर त्यात लवंगा टाका त्यानंतर आपला टोमॅटोचा बनवलेला पल्प ओतुन द्या. त्यानंतर पाण्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर ची पेस्ट बनवून पल्प मध्ये टाका. आपल्याला हवे तितके पाणी टाकून ऍडजेस्ट करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ,चवीनुसार साखर लाल तिखट टाकून उकळी आणा.

  3. 3

    छान पैकी उकळलेलं सूप सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा. त्यानंतर क्रीम ने आपल्याला हवी ती डिझाईन ने गार्निश करा.कोथंबीर टाका. अशाप्रकारे हेल्दी टोमॅटो सूप तयार. अतिशय सोपी अशी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058
रोजी

Similar Recipes