कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#week 5
#पावसाळी गंमत
पावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍
पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थ
कुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग
  1. 200 ग्रॅममक्याचे दाणे
  2. 3 चमचेतांदळाचे पीठ
  3. 50 ग्रॅमबेसनपीठ
  4. 1 टेबलस्पुनजीरे
  5. 1 टेबलस्पुनओवा
  6. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  7. चवीनुसारमीठ
  8. 2हिरवी मिरची
  9. 1कांदा बारीक चिरून
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    वाफवलेला मका 1 वाटी घ्या त्यातले 2 ते 3 चमचे मकी दाणे बाजुला काढुन घ्या.आणि बाकीचा मका मिक्सर मधून जाडसर वाटुन घ्या.व बाजुला काढलेला मका त्यात घाला.

  2. 2

    त्यात तांदळाचे पीठ, बेसनपीठ घाला व जीरे, ओवा, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद घालुन छान मिक्स करून घ्या.

  3. 3

    सर्व साहित्य एकत्र करून घ्या व पाणी न घालता छान गोळा मळुन घ्या चवीनुसार मीठ घाला.

  4. 4

    गॅस वर पॅन ठेवुन तळण्यासाठी तेल टाका तेलछान गरम झाले कि त्यात भजी तळुन घ्या मस्त मंद गॅसवर कुरकुरीत अशी भजीतळुन घ्या.

  5. 5

    तयार आहे मस्त गरमागरममक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

Similar Recipes