उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#रेसिपीबुक #week10
#मोदकरेसिपी
🙏🌺🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏
गणेशोत्सवाच्या तुम्हां सर्वांना मोदमय (आनंदमय) शुभेच्छा💐🎊🎉
गणेशउत्सव... अतिशय चैतन्यदायी आबालवृद्धांच्यामनात आनंदाची कारंजी फुलवणारा ,विद्येची ,बुद्धीची देवता असलेल्या,विघ्नांचा नाश करणार्या देवतेचा,रिद्धीसिद्धी प्रदान करणार्या बाप्पाचा,सकल कामनांची पूर्ती करणार्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या जन्मदिवस ...मग तो हर्षोल्हासातच साजरा व्हायला हवा ना.. घराघरांमध्ये जन्माष्टमी नंतर बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात.त्यांच्या स्वागतासाठी सगळे घर जोरदार तयारीला लागते.गृहिणींची साफसफाई ची लगबग,वाणसामानाची यादी..ते भरुन ठेवणं..ठेवणीतली भांडीकुंडी काढून धुवून पुसून ठेवणं,मुख्य म्हणजे आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ धुवून,वाळवून त्याची मोदकासाठी मऊसूत पिठी दळून आणली की निम्मे काम फत्ते झालेच म्हणून समजा..मुलाबाळांची सजावटीची थीम final करुन आरास खरेदीसाठी मोर्चा वळतो.असं करता करता आदला दिवस येऊन ठेपतो‌‌..मग काय कामाची लगबग विचारुच नका.‌.final touch सुरु होतो..मुलींना पत्री आणायलापिटाळलेजाते,रांगोळ्या रेखाटल्या जातात..सजावट रात्रभर जागून complete केली जाते..पै पाहुण्यांनी घराचे कसे गोकुळ होते. मग मुख्य दिवस उजाडतो.गणपती बाप्पांची कुलाचाराप्रमाणे विधीवत पूजा संपन्न होतेआणि मग या उत्सवाचा परमोच्च बिंदू येऊन ठेपतो.तो म्हणजे सुगरणींच्या हातचा सुग्रास नैवेद्य.पारंपरिक पदार्थाबरोबरच बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक अतिशय निगुतीने करतात..ज्याच्या नावातच आनंद (मोद)आहे असा पदार्थ..तांदळाच्या उकडीसारखे पांढरेशुभ्र मऊसूत मृदू मन असावे आणि त्यात गुळाखोबर्यासारखा गोडवा असावा.मग केवळआनंदाचशिंपणच..हेचतरसुचवायचे नसेलबाप्पाला🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

120 मिनीटे
25 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्राम तांदूळ पिठी
  2. 1मोठ्या नारळाचा कीस
  3. जेवढा नारळाचा किस असेल त्याच्या पेक्षा थोडा कमी गुळ
  4. 1 टेबलस्पून भाजलेली खसखस
  5. १ टेबलस्पून वेलचीपूड
  6. २ टेबलस्पून काजू बदाम पिस्ता पूड
  7. 2चिमटी मीठ
  8. 1/2 टीस्पूनतूप किंवा तेल
  9. 450मिली पाणी.

कुकिंग सूचना

120 मिनीटे
  1. 1

    प्नथम एका पातेल्यात नारळाचा कीस,गूळ एकत्र करावा.आणि हे मिश्रण शिजत ठेवावे..सारखे परतत रहा..गूळ पूर्ण वितळला की खसखस,वेलची, काजू बदाम पिस्ता पूड घालून व्यवस्थित मिक्स करावे.साधारण मिश्रण पातेल्याच्या कडा सोडू लागे पर्यंत परतत रहा..मग gas बंद करा.आपले सारण तयार झाले..थंड झाल्यावरच मोदक करायला घ्यावेत..

  2. 2

    नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे..नंतर त्यात मीठ,तेल किंवा तूप घाला..पाण्याला उकळी आली की gas slow वर ठेवा..

  3. 3

    आता या पाण्यात हळूहळू थोडी थोडी तांदळाची पिठी घालून सारखे परतून घ्या‌‌..आणि मिश्रणाला 4-5 दणदणीत वाफा काढून घ्या(.जर मिश्रण कोरडे वाटत असेल तर अजून थोडे गरम पाणी add करा.)gas बंद करा.

  4. 4

    आता परातीत थोडी उकड काढून घ्या..तेल पाण्याने मऊसूत होईपर्यंत चांगली मळून घ्या..त्यांचे गोळे करुन घ्या.

  5. 5

    नंतर एकेक गोळा घेऊन त्याला आधी वाटी सारखा आकार द्या..त्यात सारण भरुन पिठाच्या पारी करा..मग सगळ्या पार्या अलगद एकत्र करुन मोदक वळून चर्या.

  6. 6

    नंतर मोदक पात्रात एक चाळणी ठेवा..त्याला तेल लावून घ्या‌‌.. नंतर तयार झालेले मोदक पाण्यात बुडवून उकडायला ठेवा.वरुन एकेक केशर काडी लावा मोदकांना..आणि 10-12, मिनीटे medium gas वर मोदक उकडून घ्या‌‌..नंतर चाळणी बाहेर काढून मोदक कोमट होऊ देत..

  7. 7

    मोदक कोमट झाले की त्यावर भरपूर तूप,दूर्वा ठेवून बाप्पाला नैवेद्य दाखवावा..

  8. 8

    नैवेद्य दाखवून झाल्यावर या अवीट चवीच्या मोदकांचा आपण सावकाश खात खात स्वर्गीय चवीचा आनंद घ्यावा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Similar Recipes