नूडल्स (noodles recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनलरेसिपी
नूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा!

नूडल्स (noodles recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनलरेसिपी
नूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ सर्व्हिंग
  1. 1रेडिमेड नूडल्स पॅक
  2. 1मोठा बाऊल भाज्या आवडीनुसार- मी कांदा,टोमॅटो,ढोबळी मिरची,कोबी व गाजर वापरले आहे
  3. चवीनुसार मीठ
  4. 4 टेबलस्पून तेल
  5. 1 टेबलस्पून आलं- लसूण पेस्ट
  6. 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस
  7. 1 टेबलस्पून चिली सॉस
  8. 1 टेबलस्पून व्हिनेगर
  9. 1 टेबलस्पून सोया सॉस
  10. 1/2 टेबलस्पून मिरेपूड
  11. 6 कपपाणी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पाणी गरम करून त्यात १ टे स्पून मीठ व तेल अनुक्रमे टाकून नूडल्स घाला व ३-४ मिनिटे शिजवून घ्या. नूडल्स मोकळ्या करून घ्या व पाणी काढून घ्या. १ टे स्पून तेल घालून नूडल्स हलवून घ्या. (खूप जास्त शिजवू नये व पॅकेट वरील सूचनेप्रमाणे पाणी वापरावे.)

  2. 2

    कढईत २ टे स्पून तेल गरम करून घ्या व त्यात आलं -लसूण पेस्ट व कांदा घालून परतून घ्या.

  3. 3

    आता इतर भाज्या घालून परतून घ्या. मग त्यात सर्व सॉस,मीठ,मिरेपूड व व्हिनेगर घालून परतून घ्या.

  4. 4

    आता तयार नूडल्स घालून मिक्स करून घ्या. नूडल्स तयार आहेत.

  5. 5

    गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes