उपवासाची कढी (upwasachi kadhi recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4 उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ आपण करतो. पण त्यासोबत काही आंबटगोड तोंडी लावायला पाहिजे असते. अशावेळी झटपट होणारी उपवासाची कढी मदतीला येते. आमचेकडे ही कढी सर्वांनाच फार आवडते. यात दही आणि बटाट्याचा वापर केलाय.

उपवासाची कढी (upwasachi kadhi recipe in marathi)

#GA4 उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ आपण करतो. पण त्यासोबत काही आंबटगोड तोंडी लावायला पाहिजे असते. अशावेळी झटपट होणारी उपवासाची कढी मदतीला येते. आमचेकडे ही कढी सर्वांनाच फार आवडते. यात दही आणि बटाट्याचा वापर केलाय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 मेझरींग कप दही
  2. 1 टेबलस्पूनराजगि-याचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कुट
  4. 1मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा चौकोनी तूकडे करुन
  5. 2हिरव्या मिरचीचे तूकडे
  6. 10-12कढीलिंबाची पाने
  7. 1आणि 1/2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे
  8. 1आणि 1/2 टेबलस्पूनसाखर
  9. चवीनुसार मीठ
  10. आवश्यकतेनुसार पाणी
  11. 1 टीस्पूनतूप फोडणीकरीता
  12. 1 टीस्पूनजिरे

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    सर्व सामग्री एकञ ठेवावी. दह्यामध्ये राजगि-याचे पीठ आणि शेंगदाण्याचा कुट टाकून रवीने घुसळून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करुन घ्यावे.

  2. 2

    आता गॅसवर एक भांडे ठेवून गॅस सुरु करावा. त्यात तूप टाकून गरम झाल्यावर जिरे, टाकून तडतडल्यावर, हिरवी मिरची, कढीलिंब, बटाटा, शेंगदाणे टाकावे. व एक मिनीट त्याला परतून घ्यावे.

  3. 3

    त्यानंतर लगेच दह्याचे तयार मिश्रण त्यात टाकावे. त्यात चवीनुसार मीठ व साखर टाकावी. व एक दोन उकळ्या काढून घ्याव्यात.

  4. 4

    अशाप्रकारे चविष्ट, आंबटगोड उपवासाची कढी तयार आहे. ज्यांना चालत असेल त्यांनी वरुन कोथिंबीर घालून, गरमागरम, साबुदाण्याची उसळ, भगरीच्या उपम्यासोबत खायला द्यावी. अगदी नुसती वाटीत घेऊन खाल्ली तरी छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes