चायनीज पोटली (chinese potali recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी
चायनीज पोटली (chinese potali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मैद्यामध्ये मीठ व तेल टाकून मैदा छान मळून घ्यावा जेणेकरून मूठ बांधल्यावर त्याचा असा गोळा तयार होईल. मग थोडं थोडं पाणी टाकून मैदा छान मळून त्याचा गोळा तयार करून घ्यावा व त्याला झाकून ठेवावे.
- 2
आता एका भांड्यामध्ये पाणी तेल व मीठ टाकून नूडल्स तीन-चार मिनिटे उकडून घ्यावेत.
- 3
मग नूडल्सला चाळणीमध्ये टाकून पाणी काढून निथळून घ्यावे व त्यावर परत थंड पाणी टाकून घ्यावे म्हणजे नूडल्स मोकळे होतील. आता सर्व भाज्या बारीक बारीक चिरून घ्याव्यात.
- 4
आता एका पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये सर्व भाज्या क्रमाक्रमाने टाकाव्यात. नंतर मीठ, चिली फ्लेक्स,मिरे पावडर टाकून झाकण ठेवून दोन-तीन मिनिटं भाज्या शिजू द्याव्यात. भाज्या पूर्ण शिजू देऊ नये.भाज्यांमध्ये क्रंचीपणा असायला पाहिजे. भाज्या शिजून झाल्या की त्यामध्ये नूडल्स टाकावेत.
- 5
नूडल्स टाकले की त्यामध्ये चिली सॉस, सोया सॉस टोमॅटो सॉस व थोडसं मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. आता आपलं स्टफिंग रेडी आहे.नुडल्स चे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.नूडल्स करतानाही तुम्ही नूडल्स चे छोटे छोटे तुकडे करून स्टफिंग तयार करू शकता.
- 6
आता आपण तयार केलेल्या मैद्याच्या गोळ्याच्या लिंबाएवढ्या लाट्या करून घ्याव्यात. आता त्या गोळ्याची पातळसर पारी लाटून घ्यावी. त्यामध्ये नूडल्स स्टफिंग भराव.
- 7
आता या पारीची फोटोत दाखवल्याप्रमाणे पोटली तयार करून घ्यावी. अशाच प्रकारे सर्व पोटल्या तयार करून घ्याव्यात.
- 8
आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की पोटलीला तेलामध्ये तळून घ्यावे. खालचा भाग तळून झाला की, पलटवून वरचा भाग पण तळून घ्यावा. अशाप्रकारे सगळ्या पोटल्या तळून घ्याव्यात.
- 9
आता पोटलीला डेकोरेशन साठी म्हणून कांद्याच्या पातीला तेलामध्ये डुबून पोटली ला बांधून घ्यावे. तेलात डुबवल्याने कांद्याची पात नरम होते.आता आपली चायनीज पोटली खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हिला टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी, शेजवान चटणीसोबत पण खाऊन आनंद घेऊ शकता. तर नक्की करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
-
चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलपोस्ट २ स्मिता जाधव -
मॅगीची कुरकुरीत चायनीज फ्लेवर्ड भेळ.. (maggichi kukurit Chinese bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Komal Jayadeep Save -
चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3#Chinese Pallavi Maudekar Parate -
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपीRutuja Tushar Ghodke
-
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
-
-
चायनीज मनचाव सूप (Chinese Manchow soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13चायनीज लोकांची फेवरेट डिश आहे .मलाही खूप आवडते . अत्यंत पौष्टिक सूप आहे . चला तर कसे बनवतात पाहूयात ? Mangal Shah -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
इंडो-चायनिज इडली मन्चूरियन (Indo-Chinese idli manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीइडली मन्चूरियन चविष्ट आणि रुचकर असा, स्नॅक्स किंवा स्टार्टर साठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही फ्रेश इडली चा वापर करू शकता किंवा राहिलेल्या इडली चा वापर देखील तुम्ही करू शकता.इडली मन्चूरियन हे चायनीज आणि साउथ इंडियन रेसिपी चे फ्यूजन आहे. करायला अगदी सोपी पण तेवढीच चटपटीत आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे.....*इंडो-चायनिज इडली मन्चूरियन.*..💃💕 Vasudha Gudhe -
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe -
देसी चायनीज वेज मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# साप्ताहिक सूप प्लॅनरशनिवार - मंचाव सूपमंचाव सूप एक देशी इंडो- चीनी सूप आहे.जो सर्वांचाच आवडता आहे.या रेस्टॉरंट स्टाईल वेज मंचाव सूपचा स्वाद आणि सुगंध नक्कीच आपल्याला मनमोहित करेल...😊पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
पनीर शेवई चायनीज तडका(paneer shevaee chinese tadka recipe in marathi)
आपण चायनीज नेहमीच खातो . मी घरी बनविलेल्या शेवळयाना पनीर घालून चायनीज पद्धतीने बनविले. अप्रतिम झाले. Vrunda Shende -
दाकगंगजाॅंग (dakgangjeong recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल Koreanfriedchicken Ankita Khangar -
मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी Shweta Amle -
व्हेज मंचाव सूप (veg manchow soup recipe in marathi)
#सूपमस्त पावसाळी वातावरण आणि श्रावण महिना असल्यामुळे भरपूर भाज्या त्यामुळे मी मंचाव सूप करून पाहिले. खूप छान झाले म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहेDipali Kathare
-
चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)
#GA4 #week3#cooksnap arti Lokwaniमाझी डोनट रेसिपी काही कारणाने राहिली होती म्हणून मी आरती लोकवानी यांची मॅगी क्रिस्पी डोनट ही रेसिपी मध्ये काही बदल करून चायनिज डोनट ही रेसिपी शेअर करत आहे पझल मध्ये पण चायनिज हा शब्द आला आहे म्हणून Bharati Chaudhari -
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
नूडल्स (noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो.. Mansi Patwari -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale
More Recipes
टिप्पण्या (2)