खोबरा वडी (khobryachi wadi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ
गोड पासुन सुरवात ही आपण कुठल्याही सणाला करतो.. पण दिवाळी सरख्या मोठ्या सणाची सुरुवात गोड हवीच करण हा सण नात्यांचा,प्रकाशाचा,आप्त स्वकियांचा, मित्र परिवाराचा, जल्लोषाचा, दिव्यांचा. ही रेसिपी माझ्या मुलिनी केली आहे तिला ह्या उत्तम जमतात म्हणतात माझ्या सासू च्या सारखीच करते मला साखरेचा पाक ही न जमणारी गोष्ट आहे खूप प्रयत्न केलेत पण कुठे तरी बिघडतेच. पण मुलगी खुपच छान करते तर तिची ही सिंपल रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
45-50 नग
  1. 3ओले नारळ
  2. 638 ग्रॅमसाखर
  3. 115 ग्रॅममिल्क पावडर
  4. 1 टेबलस्पूनसाजुक तुप
  5. 20 ग्रॅमकिसमीस
  6. 10 ग्रॅमकाजू वरुन लावायला

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम ओले नारळ फोडून त्यातला खोबरा चा किस करुन (538 ग्रॅम इतका निघला). आत्ता कढईत तुप घेउन खोबरा कीस घाला व तिस सैकेण्ड परता.

  2. 2

    परतलेल्या खोबरा किस मधे साखर घालुन मिक्स करा व लगेच मिल्क पावडर घाला अत्ता हे सगळे एकजीव करुन पंचवीस ते तिस मिनिट घोटत रहा करण घातलेली साखर विरघळण्यास सुरुवात हाऊन पाकावर यायला लागते

  3. 3

    आत्ता त्या मधे वेलची पुड अणि किसमिस घालुन मिक्स करा व फोटो मधे दाखवल्या प्रमाणे ही टेस्ट करुन पहा सारण मधोमद घेउन मधून चम्च्यानी वेगळे करा जर एकत्र यायला वेळ लागला तर समजा वडी थापायला योग्य आहे व गैस बन्द करुन तुप लावलेल्या थाळी मधे आवडीनुसार जाड वडी थापून घ्या व गरम असतांनाच सुरी नी हलकेच रेषा पाडा

  4. 4

    अत्ता वड्या छान थंड झल्यावर त्याच रेषांनी काप करत वड्या पाडा व सोडून घ्या चवीला उत्तम नरम अश्या ह्या खोबरा वडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes