झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमभाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1/2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  4. 1 1/2 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीरा
  7. 1-2हिरव्या मिरच्या
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनसावजी मसाला
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनधणे पूड
  13. 1 1/2 टीस्पूनमीठ
  14. गार्निशींग साठी भरपूर कोथिंबीर

कुकिंग सूचना

15-20 मि
  1. 1

    सर्वप्रथम भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट करून घ्यावे. एकीकडे गॅस वर कढई तापवावे व त्यात तेल घालावे. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी व जीरे तडतडू द्यावे.

  2. 2

    त्यात कांदा व हिरवी मिरची घालून ब्राउन होईपर्यंत शिजू द्यावे.कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट घालावे व दोन मिनिटे चमच्याने फिरवत रहावे.
    त्यात तिखट हळद सावजी मसाला गरम मसाला धणेपूड व मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करावे.

  3. 3

    चमच्याने फिरवल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालावे.शेंगदाण्याचा कूट मिक्स केल्यानंतर तेलावर शिजू द्यावे व त्यात एक ग्लास पाणी घालावे. भाजीला उकळी आल्यानंतर त्यात ताजी कोथिंबीर भरपूर घालावे.

  4. 4

    आपली झणझणीत शेंगदाण्याची भाजी रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes