स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week15 की वर्ड -- स्ट्राॅबेरी.
हिवाळ्यामध्ये आपल्याला निसर्गाची मिळालेली एक अद्भुत आकर्षक सर्वगुणसंपन्न भेट म्हणजे लाल बुंद रंगाची ,मादक सुवासाची आणि आंबट मधुर चवीची अशी स्ट्रॉबेरी..🍓 खरं तर निसर्गच या स्ट्रॉबेरीच्या प्रेमात असावा म्हणूनच त्याने स्ट्रॉबेरीला लाल रंग आणि हृदयाचा आकार दिलाय असं मला नेहमी वाटतं..आणि म्हणूनच जगभरातील मानवजात या स्ट्रॉबेरीच्या प्रेमात पडली आहेत.. या फळाची प्राचीन काळापासून मानवावर भुरळ पडली आहे .प्राचीन रोम मध्ये स्ट्रॉबेरी ला सौंदर्य, प्रेम, आणि प्रजननाच्या देवीचे चिन्ह समजले जात असे. याचे कारण स्ट्रॉबेरी चा लाल रंग आणि हृदयासारखा आकार असावा हेच खरे...🍓आणि म्हणूनच स्ट्राॅबेरीला प्रेमी युगुल आपल्या प्रेमाचं प्रतीक मानतात असं म्हणायला हरकत नाही.नात्यांचा मुरलेला गोड मुरांबा .. खजानाच भरलेला आहे या एवढ्याशा फळात ..🍓सर्व रोगांवर एकच उपाय टाईप वालं हे फळं आहे.. सौंदर्याचे प्रतीक असलेली ही स्ट्राॅबेरी सौंदर्य शास्त्रात देखील मुबलक प्रमाणात वापरतात..फेस पॅक,लोशन्स, perfumes,फेसपॅक,क्रीम्स..वापरून आपण आपले सौंदर्य अधिक खुलवत असतो..बरोबर ना..
स्ट्राॅबेरी ही खरंतर आहे तशीच खावी natural रुपातली ..🍓असं मला वाटतं..पण सिझन नसताना सुद्धा खायला मिळावी म्हणून स्क्वॅश, जाम ,सरबत ,मुरांबे ,चाॅकलेट्स,कॅंडीज अशा स्वरूपामध्ये स्ट्रॉबेरीचा आपण वापर करू शकतो आणि स्ट्रॉबेरी चा आनंद घेऊ शकतो. म्हणूनच आज मी अगदी सोपा आणि वर्षभर कधीही स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येईल असा स्ट्रॉबेरी मुरांबा 🍓केलेला आहे. मिल्क शेक,केक,कुकीज, बर्फी ,शिरा,हलवा यामध्ये देखील हा मुरांबा तुम्ही हव्या त्या प्रमाणात वापरा. कृतीकडे जाऊ या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
10-12 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबारीक चिरून घेतलेले स्ट्रॉबेरी
  2. 3 कपसाखर
  3. 1/2 टीस्पूनसायट्रिक ऍसिड ऐच्छिक.. मी घातलेले नाही

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    प्रथम स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत

  2. 2

    आता एका जाड बुडाच्या पातेल्यात स्ट्राॅबेरी घाला आणि त्यात साखर मिसळून 5-6तास पातेलं तसंच झाकून ठेवा.साखरेला पाणी सुटेल.

  3. 3

    नंतर अगदी मंद आचेवर वरील मिश्रण सतत ढवळत राहावे..नाहीतर खाली लागू शकते.. हळूहळू मिश्रणाला उकळी येऊ लागेल..साखरेचा दोन तारी पाक झाला की गॅस बंद करावा..आणि अवीट गोडीचा मुरांबा थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून बरणी फ्रीज मध्ये ठेवा..कारण मी सायट्रिक ऍसिड घातले नाही..

  4. 4

    पोळी,ब्रेड बरोबर तोंडी लावणे म्हणून स्ट्राॅबेरी मुरांबा सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes