चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4 #week16 की वर्ड चवळी...पौष्टिक आणि चटकदार...

चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)

#GA4 #week16 की वर्ड चवळी...पौष्टिक आणि चटकदार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचवळी
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो चिरून
  4. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनधणे पावडर
  8. 1/2 टीस्पूनमसाला
  9. चवीनुसारमीठ
  10. चिमुटभरसाखर
  11. कोथिंबीर
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  14. 7-8कढीपत्ता पाने
  15. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    चवळी स्वच्छ धुऊन 5-6 तास भिजत घालावी. त्यानंतर ती उकडून घ्यावी. म्हणजे शिजवायला त्रास होत नाही.

  2. 2

    आता गॅस सुरू करून गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. जीरे मोहरी, कांदा, कढीपत्ता टाकावा. परतून घेतल्यावर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, तिखट, धणे पूड, मसाला टाकून एकत्र करावे. चांगले परतून घेतल्यावर, टोमॅटो टाकावे.

  3. 3

    मिक्स केल्यानंतर, त्यात, उकडून घेतलेली चवळी टाकावी. मीठ टाकावे.

  4. 4

    मिक्स करून थोडेसे पाणी टाकावे. कारण आधीच उकडून घेतल्यामुळे जास्त पाण्याची गरज पडत नाही. झाकण ठेवून, 5 मिनिट शिजवावे.

  5. 5

    झाकण काढून चिरलेली कोथिंबीर टाकावी. व मिक्स करून घ्यावे. चवदार आणि चटकदार चवळीची उसळ गरमागरम खाण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes