भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.

भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)

नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. २०० ग्राम भेंडी
  2. 3 टेबल्स्पूनतेल
  3. 2 टेबलस्पूनबेसन
  4. 2 टीस्पूनलाल तिखट पावडर
  5. 1 टीस्पूनधना पावडर
  6. 1 टीस्पूनजिरा पावडर
  7. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. मीठ
  10. 2-3कांदे
  11. 1टोमॅटो
  12. 3-4पाकळ्या
  13. 1 इंचआले
  14. कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    आपल्याला भेंडी घेताना खूप मोठ्या नाही साधारण मीडियम साईज ची भेंडी घ्यायचे आहे. प्रथम भेंडी पाण्याने स्वच्छ धुऊन कापडाने पुसुन घ्याव्यात.मग या सर्व भेंडी मध्ये एक चिरून घ्यायचे आहेत कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. त्यानंतर बेसन थोडसे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे.

  2. 2

    आता एक कांदा किसून घ्यावा. अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यावी. सर्व मसाले काढून घ्यावेत लाल तिखट पावडर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, आमचूर पावडर, मीठ व बेसन. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करताना त्यामध्ये साधारण अर्धा टीस्पून तेल घालायचे आहे म्हणजे आपले मिश्रण व्यवस्थित एकजीव होते. हा झाला आपला भेंडी भरण्यासाठी मसाला तयार

  3. 3

    आता हा तयार झालेला मसाला एक एक भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. पद्धतीने सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेणे. त्यानंतर एक कांदा व टोमॅटो थोडे मोठे पीसेस करून कट करून घेणे.

  4. 4

    आता एका कढईमधे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कट केलेला कांदा व टोमॅटो फ्राय करून घ्यावेत. यामध्ये थोडेसे मीठ घालावे कारण आपण भेंडीच्या मध्ये मीठ घातलेले आहे. कांदा टोमॅटो झाल्यावर त्यामध्ये आता आपण भरलेल्या सर्व भेंडी घालून त्या फ्राय करून घेणार आहोत.

  5. 5

    भेंडी पाच मिनिटे फ्राय करून झाल्यावर आता पण मंद आचेवर झाकण ठेवून ते व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत.भेंडी शिजल्यावर झाकण काढून ती थोडावेळ फ्राय करायला ठेवणे. म्हणजे ती क्रिस्पी बनतात. आता वरून कोथिंबीर घालून भरवा भेंडी चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes