मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया

मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम मेथीची पाने
  2. ५० ग्रॅम गव्हाचे पिठ
  3. २० ग्रॅम बेसनपिठ
  4. 1 टीस्पूनओवा
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1-2 टीस्पूनतिखट
  7. 2-3मिरच्या बारीक चिरलेल्या
  8. 1 टीस्पूनआल्याचा किस
  9. 1-2 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबीर
  10. 1-2 टेबलस्पुनदही
  11. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  12. 2 टीस्पूनतेल
  13. चविनुसारमीठ
  14. 1 टीस्पूनजीरे
  15. 2 टेबलस्पुनगोड दही
  16. 2 टेबलस्पुनआवळ्याचे लोणचे

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम मेथी निवडुन फक्त जास्त पाने निवडा ती स्वच्छा पाण्याने धुवुन पाणी निथळुन प्लेटमध्ये काढुन घ्या

  2. 2

    कढईत २ टिस्पुन तेल गरम करून त्यात जीरे टाका जीरे तडतडल्यावर मेथी टाका थोड मीठ टाका व परतुन मेथी शिजवुन घ्या

  3. 3

    शिजलेली मेथी प्लेटमध्ये काढुन थंड करा

  4. 4

    परातीत गव्हाचे पिठ बेसन पिठ ओवा हळद तिखट मीठ टाकाआलं किसुन घ्या कोथिंबीर व मिरच्या कापुन घ्या व पिठात मिक्स करा

  5. 5

    नंतर त्यात दही व शिजलेली मेथी पिठात मिक्स करून घ्या

  6. 6

    पिठ मळुन घ्या नंतर पिठाचे लहान लहान गोळे घेऊन पराठे लाटा

  7. 7

    गरम तव्यावर साजुक तुपावर पराठे खरपुस भाजा

  8. 8

    गरमागरम तयार मेथी पराठे डिश मध्ये सर्व्ह करा सोबत गोड दही व आवळ्याचे लोणच दया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes