भगर कोरियंडर शाही सूप (bhagar coriander shahi soup recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#fr #उपवास म्हंटले की पचनास हलके फुलके खाल्ले जाते. असे म्हणतात की एक दिवस पोटाला आराम अर्थात आपण त्या दिवशीही म्हणजेच उपवासाच्या दिवशी ही वेगवेगळे चविष्ट पदार्थ करून खातोच. भगर कोरिअंडर शाही सूप हा सूप चा किंवा उपवासाच्या सूपचा असा प्रकार आहे की तो लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडु शकतो तसेच पचनास हलका व चविष्ट आहे. तसेच डायट फोलो करणाऱ्यांसाठी ही झटपट तयार होणारा व पौष्टिक दमदार पदार्थ आहे आहे. काही वेळेस घरात फक्त गृहिणींचे उपास असतात अशा वेळेस त्या फक्त चहा घेऊन उपवास करतात. अशावेळेस ऍसिडिटी होते त्यासाठी हा पदार्थ झटपट तर बनवला जाऊ शकतो शिवाय शरीरात पुरेशी एनर्जी पण निर्माण करतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
तीन जणांसाठी
  1. 50 ग्रॅमभगरीचे पीठ
  2. 40 ग्रॅमउपवासाच्याभाजणीचे पीठ (शिंगाडा केळीचे,व राजगिरा पीठ)
  3. 30 ग्रॅमसाबुदाणा पीठ
  4. 30 ग्रॅमभिजवलेला साबुदाणा
  5. 1शिजवून बारीक तुकडे केलेले रताळी
  6. 1 टेबल स्पूनसाजूक तूप
  7. 3हिरव्या मिरच्या
  8. तुकडाछोटासा आले
  9. 1लिंबू
  10. चवीनुसारमीठ
  11. आवडीनुसार कोथंबीर
  12. चवीनुसारगुळ
  13. फोडणीसाठी जीरे
  14. ५०० मि.ली. पाणी

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा भिजवून घ्यावा. आता कोथिंबीर व हिरव्या मिरचीची बारीक पेस्ट तयार करावी.

  2. 2

    आता कढईमध्ये तूप गरम करत ठेवावे. तूप तापल्यावर जीरे याची फोडणी करावी. व त्यात सर्व पीठे जसे की साबुदाणा, भगर, राजगिरा, केळीचे, शिंगाड्याचे म्हणजेच भाजणीचे पीठ खरपूस भाजून घ्यावे.

  3. 3

    भाजणी चे सर्व पीठ भाजून झाल्यानंतर त्यात आपण बनवलेली कोथंबीर व मिरचीची पेस्ट घालावी. व लागता लागता पाणी घालावे.

  4. 4

    सूप ला उकळी आल्यावर त्यात रताळ्याचे काप व साबुदाणा घालावा.व साबुदाणा शिजेपर्यंत उकळू द्यावे व आपल्याला हव्या त्या प्रमाणात घट्ट बनवून घ्यावे.

  5. 5

    तयार आहे भगर कोरियंडर शाही सुप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

Similar Recipes