ओट्स मुगदाळ खिचडी (oats moongdaal khichdi recipe in marathi)

Vaishali Dipak Patil
Vaishali Dipak Patil @vaishu

#kr ओट्स मुगदाळ खिचडी माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. ओट्स हा एक पौष्टिक आहार आहे.

ओट्स मुगदाळ खिचडी (oats moongdaal khichdi recipe in marathi)

#kr ओट्स मुगदाळ खिचडी माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. ओट्स हा एक पौष्टिक आहार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मि.
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीओट्स
  2. 1/2 वाटीमुगदाळ
  3. 2टोमॅटो बारीक कापलेला
  4. 2कांदेेेेेेेेेेेेेेेे बारीक कापलेला
  5. 1मिरची बारीक कापलेली
  6. 5कढीपत्ता
  7. चिमूटभरहिंग
  8. 1/2 चमचाहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 चमचालाल तिखट
  11. 1 चमचेधणे पावडर
  12. 2-3 पळ्या तेल
  13. 1 चमचाजीरे , मोहरी
  14. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  15. 8-10 लसणाचे बारीक काप

कुकिंग सूचना

25मि.
  1. 1

    सर्वप्रथम मुगदाळ छान साफ करून धुवून घ्या. थोडी भिजून घ्या.1 वाटी ओट्स घ्या.

  2. 2

    आता कुकर मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जीरे घालावे, नंतर कांदा घालून परतावे, हिरवी मिरची घालावी व परतत असताना त्यात कढीपत्ता, हिंग चिमूटभर व लसुण काप घालून परतावे नंतर आले लसुण पेस्ट घालावी.

  3. 3

    आता त्यात 1चमचा लाल तिखट, 1चमचा धणे पावडर, 1/2चमचा हळद इ. सर्व घालुन परतावे.

  4. 4

    आता या फोडणीत बारीक कापलेला टोमॅटो घालून मीठ चवीनुसार घालून परतावे.

  5. 5

    आता कुकर मध्ये 1/2 वाटी भिजवलेली मूगदाळ आणि 1वाटी ओट्स घालून परतावे.

  6. 6

    नंतर त्यात गरजे नुसार पाणी घालून. कुकर बंद करून मंद आचेवर 2शिट्या घ्याव्या.

  7. 7

    आपली गरमागरम आणि पौष्टीक मूग डाळ ओट्स खिचडी तयार आहे. कोथिंबीर घालून खिचडी गरमा गरम सर्व्ह करा..😋😋
    Please try 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Dipak Patil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes