आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#trending recipe
#aambedal
मराठी माणसाच्या घराघरात आंबेडाळ आणि कैरीचे पन्ह हे केलं जातं. महाराष्ट्राची फेमस अशी डाव्या बाजूला म्हणून पानात वाढली जाणारी आंबेडाळ उन्हाळ्यात अगदी हमखास खाल्ली जाते. चैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या समारंभात केला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ. छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थ. नक्की करून पहा.

आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)

#trending recipe
#aambedal
मराठी माणसाच्या घराघरात आंबेडाळ आणि कैरीचे पन्ह हे केलं जातं. महाराष्ट्राची फेमस अशी डाव्या बाजूला म्हणून पानात वाढली जाणारी आंबेडाळ उन्हाळ्यात अगदी हमखास खाल्ली जाते. चैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या समारंभात केला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ. छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थ. नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 minite
10 सर्विंग
  1. 250 ग्रामचना डाळ
  2. 1/2 कपओल खोबरे
  3. 1कैरी
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 टेबलस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 8-10कढीपत्त्याची पाने
  10. 4-5हिरव्या मिरच्या
  11. 2/3 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  12. 2 टेबल्स्पूनतेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

20-25 minite
  1. 1

    सर्वप्रथम चणाडाळ घेऊन तीन चार तास पाण्यात भिजवून घ्यावी. भिजल्यानंतर डाळ गाळणी वर काढून घेऊन सगळे पाणी निथळून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजलेली चणाडाळ बारीक वाटून घेऊ. डाळ दळताना पाणी न घालता तशीच ओबडधोबड दळून घ्यावी.

  2. 2

    कैरी घेऊन किसणीने किसून घ्यावी. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेल्या चणाडाळीत कैरीचा किस, ओल खोबरे,मिरच्या, मीठ, साखर घालून रवाळ वाटून घ्यावे.

  3. 3

    आता एका कढल्यात तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ही फोडणी वाटलेल्या डाळीवर घालून डाळीत फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
    वरुन कोथिंबीर घालून आंबेडाळ सर्व्ह करावी.

  4. 4

    आता तयार आहे आंबेडाळ. आंबेडाळ खाऊ या आणि उन्हाळ्यात जेवणाची रंगत वाढवूया.
    टिप्स- तयार डाळ जास्त वेळ बाहेर ठेऊ नये. उन्हाळ्यामुळे लवकर फसफसते. फ्रीजमध्ये ठेवलेली चांगली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes