मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

Adarsha Mangave
Adarsha Mangave @adarsha_m
Bangalore

#cr - मिसळ पाव हि महाराष्ट्रातली एक खूप प्रसिद्ध अशी कॉम्बो डिश आहे. महाराष्ट्र आणि त्यात मिसळ म्हणलं कि आठवते ती झणझणीत तिखट अशी मिसळ पाव. तीच रेसिपी मि आज इथे प्रस्तुत करत आहे.आशा आहे तूम्हाला नक्कीच आवडेल, जर तुम्हाला आवडली आणि तुम्ही बनवून पहिलीत तर मला कुक्स्नप् नक्की करा.

मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#cr - मिसळ पाव हि महाराष्ट्रातली एक खूप प्रसिद्ध अशी कॉम्बो डिश आहे. महाराष्ट्र आणि त्यात मिसळ म्हणलं कि आठवते ती झणझणीत तिखट अशी मिसळ पाव. तीच रेसिपी मि आज इथे प्रस्तुत करत आहे.आशा आहे तूम्हाला नक्कीच आवडेल, जर तुम्हाला आवडली आणि तुम्ही बनवून पहिलीत तर मला कुक्स्नप् नक्की करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 -30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 5-6पाव
  2. 2 वाटीमोड आलेली मटकी
  3. 2कांदा बारीक चिरलेला
  4. थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
  5. 1 चमचासाखर
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 लहानबटाटे
  8. 1टॉमेटो बारीक चिरलेला
  9. 2 चमचेतिखट (लाल मिरची पावडर)
  10. 2 चमचासुखे खोबऱ्याचे काप
  11. 1 चमचाआलं लसुण पेस्ट
  12. 1 चमचागरम मसाला
  13. 2 चमचेतेल
  14. 1 चमचाजीरे
  15. 1 चमचाहळद
  16. 1/4 चमचाहिंग पूड
  17. 1लिंबु
  18. थोडे फरसान

कुकिंग सूचना

20 -30 मिनिटे
  1. 1

    मोड आलेली मटकी स्वच्छ धुऊन घ्या.

  2. 2

    आता बटाटे साल काढून मोठे मोठे काप करून घ्या.

  3. 3

    कूकर मधे १ कप पाणी, बटाटा आणि मटकी घालून १ शिट्टी काढून घ्यावे.

  4. 4

    आता एका पॅन मधे तेल गरम करून त्यात जीरे, हिंग पूड, आल लसूण पेस्ट, कांदा, खोबऱ्याचे काप घालून छान परतून घ्या. टॉमेटो घालून परतून घ्या. आता त्यात गरम मसाला, शिजलेले मटकी, बटाटा घाला. साखर, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला घालून छान मिसळा व ४-५ मिनिटे छान शिजु द्या.

  5. 5

    आता कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

  6. 6

    मिसळ आता तयार आहे. एका प्लेट मधे मिसळ घाला त्यावर चिरलेला कांदा, कोथिंबीर व थोडेसें फरसाण घाला. ब्रेड/ पाव त्रिकोनि कापुन मिसळ बरोबर सर्व करा. लिंबूचि एक फोड पण द्या.

  7. 7

    स्वादिष्ट गरमा गरम मिसळ पाव तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adarsha Mangave
रोजी
Bangalore
Adis KitchenHealthy Food - Healthy Life 😊
पुढे वाचा

Similar Recipes