मेदू वडा (medu vada recipe in marathi)

sandhya joshi
sandhya joshi @cook_23984848

#cr

मेदू वडा (medu vada recipe in marathi)

#cr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 कप उडीद डाळ
  2. 2हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
  3. 5-6कढीपत्ता पाने, बारीक चिरून
  4. 1/2 टीस्पूनजाडसर किसलेले आले
  5. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    उडीद डाळ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे

  2. 2

    नंतर त्यात हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मीठ असे घालून मिक्स करावे. आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये मिश्रण एका वाटी मध्ये काढावे.

  3. 3

    वडे तळायला घ्यायच्या आधी एका बाउलमध्ये पाणी घ्यावे. उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा, म्हणजे वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडताना पिठ हाताला चिकटणार नाही.

  4. 4

    तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम हायवर ठेवावा. (टीप २) वडे सोनेरी किंवा गडद सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चटणी आणि सांबाराबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
sandhya joshi
sandhya joshi @cook_23984848
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes