मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2पिकलेले हापूस आंबे
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 1/2 कपदूध
  4. 1/2 वाटी दुधाची साय
  5. 4मारी बिस्किटे
  6. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  7. 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    आंब्यांची साल काढून त्याचा खिसनीने गर काढून घ्यावा. आंब्याच्या थोडया रसात कॉर्नफ्लोअर चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर आंब्याचा गर, साखर, दूध व कॉर्नफ्लोअर मिश्रित रस एकत्र मिक्सरला लावून घ्यावे.

  2. 2

    पॅन गरम करून त्यात आंब्याचे मिश्रण चांगले दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यावे. मिश्रण दाटसर होईपर्यंत सतत ढवळत रहावे. कॉर्नफ्लोअरमूळे गूठळ्या होण्याची शक्यता असते. शिजल्यावर थंड होऊ द्यावे.दुधाच्या सायमध्ये १ टीस्पून साखर, इसेन्स घालून मिक्सरला किंवा फेटून घ्यावे. बिस्किटे क्रश करून घ्यावीत.

  3. 3

    बाउलमध्ये तळाला बिस्कीट क्रश चा थर लावावा, त्यावर आंब्याचे मिश्रण, नंतर बिस्कीट क्रश, त्यावर सायचा थर, क्रश, आंब्याचे मिश्रण असे लेयर देऊन फ्रीझमध्ये सेट करायला ठेवून द्यावे.

  4. 4

    सेट झाल्यावर तयार "मँगो पुडींग" सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes