रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1 कपजाड रवा
  2. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1 टेबलस्पूनमटार
  5. 1 टेबलस्पूनगाजर बारीक चिरुन
  6. 1 टीस्पूनउडीद डाळ
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 5-6कढीपत्त्याची पाने
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1 टीस्पूनसाखर
  11. 1 टेबलस्पूनतूप
  12. मीठ चवीनुसार
  13. 3 कपपाणी
  14. तेल
  15. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  16. बारीक शेव

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम रवा तुपावर किंवा तेलात खमंग वास येईपर्यंत,रंग बदलेल पर्यंत भाजावा.एकीकडे पाणी तापत ठेवावे.

  2. 2

    नंतर कढईत तेल तापवून त्यात मोहरी टाकावी.तडतडू लागल्या वर जीरे,हिंग उडीद डाळ टाकावे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये कांदा,गाजर,मटार, टाकून परतून घ्यावे.एक मिनिटे वाफ काढावी.

  4. 4

    नंतर रवा टाकून एकजीव करावे व गरम झालेले पाणी सावकाश ओतावे.एकदम ओतल्यास तोंडावर उडण्याची भीती असते.गॅस बारीक करावा.

  5. 5

    त्या मध्ये मीठ,साखर तुप घालावे.चांगले हलवावे व झाकण ठेवावे.दोन तीन मिनिटांत चांगली वाफ येईल.

  6. 6

    नंतर गॅस बंद करावा.वरून कोथिंबीर घालावी लिंबू पिळावे,शेव टाकून खायला द्यावे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

Similar Recipes