स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#GA4
#week9
#fried
इव्हिनिंग स्नॅक्सचा चमचमीत प्रकार स्प्रिंग रोल..नक्की करून पहा.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिटे
15 सर्व्हिंग्ज
  1. स्प्रिंगरोल शीट बनवण्यासाठी-
  2. 1 कपमैदा
  3. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  4. 1 टीस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1 कपपाणी
  7. स्टफिंगसाठी-
  8. 1 कपकोबीचे पातळ काप
  9. 1/2 कपगाजराचे पातळ काप
  10. 1/2 कपफरसबी, पातळ तिरके काप
  11. 2मध्यम भोपळी मिरची, पातळ उभे काप
  12. 2 टीस्पूनलसूण, बारीक चिरून
  13. 1 टीस्पूनआले, बारीक चिरून
  14. 2 टीस्पूनसोया सॉस
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. 1/4 टीस्पूनमिरपूड
  17. 2 कपतेल स्प्रिंगरोल तळण्यासाठी
  18. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    स्प्रिंगरोल शीट बनवण्यासाठी प्रथम एका बाउल मध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, तेल, मीठ व पाणी ही सर्व सामग्री मिसळुन घ्या. एका नॉनस्टिक पॅन मध्ये तेल न लावता या घोळाला पसरवा. एकाच बाजुनी हलके होईपर्यंत शेका.

  2. 2

    पॅन मधून हाताने हलकेच काढून घ्या. स्प्रिंगरोल शीट एकमेकांवर ठेवताना थोडे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा भुरभुरावा म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत.
    फरसबी, कोबी, गाजर आणि भोपळी मिरचीचे उभी चिरून घ्यावी.

  3. 3

    कढईत तेल गरम करावे. त्यात आलेलसूण व कांदा परतावा. फरसबी, कोबी, गाजर, आणि भोपळी मिरची घालून साधारण ३० सेकंद मोठ्या आचेवर परतावे.

  4. 4

    नंतर मीठ, मिरपूड आणि सोया सॉस घालून ३० सेकंद ढवळावे. आच बंद करून सारण एका बोलमध्ये काढून ठेवावे.

  5. 5

    एक स्प्रिंगरोल शीट घेउन त्याच्या एका कडेला एक चमचा सारण ठेवावे. डावी आणि उजवी बाजू आत फोल्ड करून दोन वेळा रोल करून पुढे रोल करत न्यावी.

  6. 6

    शेवटी मैदा+पाण्याच्या पेस्टने कड चिकटवून टाकावी.अशाप्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवावे.

  7. 7

    तेल गरम करून मध्यम आचेवर रोल तळावेत. मध्ये तिरके कापून टिशू पेपर वर ठेवावेत.

  8. 8

    स्प्रिंग रोल्स गरमगरम चिली सॉस,टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes