मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)

#MSR
पावसाळ्यातील रानभाजीपैकी एक भाजी आता बाजारात मिळायला सूरवात झाले ती म्हणजे मायाळू. आमच्याकडे ह्या भाजीला वाळीची भाजी म्हणतात. इंग्रजी मध्ये ह्या भाजीला मलबार स्पिनच असे म्हणतात. ह्याची आज मी भजी केली आहे. ह्या भाजीचे बरेच वेगवेगळे पदार्थ करतात. ही डाळी सोबत शिजवून त्याची आमटी सुद्धा बनवतात.खूप छान लागते. आज आपण भजीची रेसिपी पाहू
मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)
#MSR
पावसाळ्यातील रानभाजीपैकी एक भाजी आता बाजारात मिळायला सूरवात झाले ती म्हणजे मायाळू. आमच्याकडे ह्या भाजीला वाळीची भाजी म्हणतात. इंग्रजी मध्ये ह्या भाजीला मलबार स्पिनच असे म्हणतात. ह्याची आज मी भजी केली आहे. ह्या भाजीचे बरेच वेगवेगळे पदार्थ करतात. ही डाळी सोबत शिजवून त्याची आमटी सुद्धा बनवतात.खूप छान लागते. आज आपण भजीची रेसिपी पाहू
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मायाळू ची पाने स्वच्छ धुऊन घ्या.
- 2
एका भांड्यात १ कप बेसन,१ चमचा तांदळाचे पीठ हे एकत्र घ्या.त्यात एक चमचा लाल तिखट घाला.
- 3
अर्धा चमचा हळद,अर्धा चमचा धणे पावडर,चवीनुसार मीठ आणि पाव चमचा ओवा घाला.
- 4
हे सगळे कोरडेच छान मिक्स करून घ्या. पण गरजेनुसार पाण्याचा वापर करून भजी साठी लागते त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्या. अंदाजे अर्धा कप पाणी लागेल. खुप पातळ किंवा खूप घट्ट पीठ भिजवू नये.
- 5
आता कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल गरम करा.
- 6
आता मायाळूची जी पाने स्वच्छ धुऊन ठेवली,त्यातील एक एक पान घेऊन तयार बॅटर मध्ये घोळवून कढई मधील तेलात तळून घ्या.
- 7
भजी दोन्ही बाजूंनी परतून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.आपल्या आवडीप्रमाणे चटणी किंवा सॉस सोबत मस्त फस्त करा.😃
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
शिराळ्याची भजी (Shiralachi Bhaji recipe in marathi)
मी प्राजक्ता पाटील मॅडम ची शिराळा भजी रेसिपी मी कुकस्नॅप केली.मस्त झाली भजी..मला खूप आवडली.. Preeti V. Salvi -
घोसाळी/गिलक्याची भजी (ghosali bhaji recipe in marathi)
#KS2माझं आजोळ नाशिक सुट्टीत आजीकडे गेलो की आजी गरमागरम भजी करून द्यायचीवेलीवरची ताजी घोसाळी तीथे गिलकी बोलतात त्याची भाजी खूप मजा यायची👌👌☺️☺️ Charusheela Prabhu -
कुरकुरीत कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
कोकणात गेल्यावर कुरकुरीत कांदा भजी व चहा नाही पिला तर काही मज्जा नाही केली. तर चला आपण पाहू झटपट होणारी कांदा भजी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात बाहेर असा मस्त पाऊस पडत असताना खावीशी वाटतात ती गरमागरम भजी. आंम्ही सिंहगडाला गेलो असताना तिथे खाल्लेली खेकडा भजी व कांद्याची चटणी कायम लक्षात राहणारी इतकी टेस्टी होती.म्हणुन आज खेकडा भजी. Sumedha Joshi -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
कोबीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. आज मी कोबीची भजी केली. खूप छान लागतात.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कांदा भजी
#फोटोग्राफी काही तरी खमंग खायच मूड झाला तर लगेच डोळ्यासमोर येणार पदार्थ. कांदा भजीला दुसर्या भजीची सर नाही. चला तर मग तयार करूया कांदा भजी. 🌰 Veena Suki Bobhate -
मायाळु भजी (mayaloo bhaji recipe in marathi)
#फ्राईडमायाळु ही वनस्पती रानभाजी प्रकार असुन कोकणात जास्त प्रमाणात ऊपलब्ध आहे.. आता ह्या वनस्पतीचे आरोग्यवर्धक औषधी गुणांमुळे अनेकांकडून ह्याचा सेवनासाठी वापर होताना दिसतोय, तरीही बरेच जण अजुनही ह्याच्या विषयी अनभिज्ञ असल्याने मुद्दाम पाककृतिसाठी ही भाजी निवडली आहे .मायाळु वेलवर्गीय वनस्पती असुन अनेक व्याधींसाठी औषधी आहे, ह्याचे खोड सहज रूजते . ' ईंडियन स्पिनॅच ' ,'पोई' ही सुद्धा नावाने ऐळखल्या जाते , माझ्या लहानपणी माहेरी जांभळी पोईचा(मायाळु) वेल होता, आई त्याची पातळ भाजी, पानांचे भजे करत असे.चवीला अतिशय स्वादिष्ट असत, पण तेव्हा मायाळु चे महत्व माहित नव्हते . आज ह्याची भजी केलीत . Bhaik Anjali -
बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)
#Breakfast # खरे तर आज काही बटाट्याची भजे करण्याचे प्रयोजन नव्हते. कांद्याची खेकडा भजी होती. पण खाण्याचे वेळी ती कमी पडली. म्हणून वेळेवर, ही बटाट्याच्या किसाची गरमागरम भजी... मध्ये, एका मैत्रिणीने केली होती... म्हणून लगेच करायला घेतली..🥰 आणि मग गरमागरम भजी असल्यावर, सोबत वाफाळता चहा... मग काय विचारता.. Varsha Ingole Bele -
गिलक्याची भजी (gilkyachi bhaji recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडतोय...भजी तर झालीच पाहिजेत..घरात गिलकी आणलेली होती गिलक्याची भजी मला खूप आवडतात..झटपट होतात आणि मस्त लागतात..लगेच बनवून फस्त केली. Preeti V. Salvi -
विड्याच्या पानांची भजी (vidyacha pananchi bhaji recipe in marathi)
#gurश्री महालक्ष्मी साठी महानैवेद्य केला जातो, त्यात आवर्जून विड्याच्या पानांची भजी केली जातात. Arya Paradkar -
हेटीच्या फुलांची भजी (hetichya fulanchi bhaji recipein marathi)
हेटीची फुले म्हणजेच हादग्याची फुले.ही फुले जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होतातच अशावेळी याची भाजी ,भजी बनवली जातात .ही भजी खूपच सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात आपण हेटीच्या फुलांची भजी किंवा हादग्याच्या फुलांची भजी. Supriya Devkar -
पोटॅटो भजी
#goldenapron3 week 7 पोटॅटोपोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत Ujwala Rangnekar -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#Cooksnap_Challenge#भजी_रेसिपीज#घोसाळ्याची_भजी घोसाळे ही एक अतिशय प्राचीन भाजी आहे आणि तिचा उगम भारतातला मानला जातो. हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. घोसाळे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आर्द्रता ,जीवनसत्व ब आणि क, चरबी आणि फायबर, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नियासिन, प्रथिने, खनिजे यांनी समृद्ध आहे. आयुर्वेदानुसार घोसाळे अग्निवर्धक, शीतल, रुचकर आणि कफनाशक आहे. त्यामुळे आपण हे आरोग्यदायी घोसाळे विविध रेसिपींच्या स्वरूपात खाऊ शकतो. आपण घोसाळ्यापासून मूग डाळ घालून चविष्ट भाजी , स्वादिष्ट रायता तयार करु शकतो किंवा चमचमीत भजी देखील .😋.. विशेष म्हणजे पावसाळ्यात बाहेर धो धो कोसळणारा पाऊस, हातात गरमागरम भजीची प्लेट आणि सोबत आलं घालून केलेला फक्कड चहाचा कप...अहाहा... मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं???...मला विचाराल तर हेच ते स्वर्गसुख..😍😋😋 आज मी आपली मैत्रीण @Rajashree_chef1 राजश्री येळे यांची घोसाळ्याची भजी थोडा बदल करुन cookdnap केली.राजश्री ,खूप खमंग आणि चवदार झालीत भजी..😋😍..Thank you so much dear for this wonderful recipe..🌹❤️ Bhagyashree Lele -
गडावरची कांद्याची भजी (gadavarchi kandhyachi bhaji recipe in marathi)
#KS2 #कांद्याची भजी # खेकडा भजी #पुणे म्हटले, की पर्यटनाला जाणारा पर्यटक हमखास महाराजांच्या, गडावर जाणार.. आणि, सिंहगडावर गेल्यावर हमखास प्रत्येक जण ही खेकडा भजी, खाल्ल्याशिवाय खाली उतरत नाही , एवढी ती प्रसिद्ध आहे.. अशी ही पुण्याच्या सिंहगडची कुरकुरीत, कांद्याची खेकडा भजी.... Varsha Ingole Bele -
बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)
# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली. Sujata Gengaje -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी "बटाटा भजी" लता धानापुने -
ओव्याच्या पानांची भजी (ova bhaji recipe in marathi)
पावसाळा म्हंटलं कि घराघरात भजी हि झालीच पाहिजे. आज जरा वेगळी म्हणजे ओव्याच्या पानांची भजी केली आहे Manali Jambhulkar -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
वांग्याची भजी (vangyachi bhaji recipe in marathi)
#tmr#कमीत कमी वेळात बनणारी रेसिपी चॅलेंज "वांग्याची भजी" लता धानापुने -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4#week12# बेसनहिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू असे आहेत की, ज्याचा आनंद भजी खाल्ल्याशिवाय अपूर्णच राहतो. पावसाळ्यात आपण मोजक्याच प्रकारचे भजी खाऊ शकतो पण हिवाळ्यात मात्र विविध प्रकारच्या भज्यांचा आपल्याला आस्वाद घेण्याची संधी असते. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितले किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. Deepti Padiyar -
मिरचीची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
भजी हा विषय घरातल्या सर्वांच्या आवडीचा! बटाटा,सिमला मिरची, कच्ची केळी , ओव्याचे पानं, वांग्याची भाजी..... भजी म्हणजे कसलीही करू शकतो. त्याचप्रमाणे ही चटकदार मिरचीची भजी आज आपण पाहूया. Anushri Pai -
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#BWRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो. Vandana Shelar -
कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)
ह्या महिन्यात बाजारात छोट-छोटे भाजीचे कच्चे फणस येतात. ते खास भाजीचे असतात त्याची भाजी खूप छान होते वर्षातून एकदाच येत असल्याने एकदा तरी याची भाजी बनवून खावी चला तर बघूया भाजी कशी बनवायची nilam jadhav -
हादग्याच्या फुलांची भजी/अगस्तीच्या फुलांची भजी (Hadgyachya Fulanchi Bhajji Recipe In Marathi)
#WWR रानभाजी प्रकारातली ही फूले थंडीत मोठ्याप्रमाणात मिळतात. याची भाजी तसेच भजी खूप छान चवीची असतात. झटपट बनता येते असे भजी आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#wdr#कांदाभजीवीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहेपूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होतेमधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीचअशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे Chetana Bhojak -
भजी (bhaji recipe in marathi)
भजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले ना,मग ती कांदा भजी असू दे किंवा बटाटा, भजी,घोसवळया ची,पालक भजी,मी आज बटाटा आणि कांदा भजी करुन दाखवणार आहे Smita Kiran Patil -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
अगदी आत्ता मनात आली आणि रेसिपी करायला घेतली अशी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे भजी.मी आज कांदा भजी केली आहेत.कुरकुरीत आणि कमीत कमी वेळेत.#tmr Anjali Tendulkar
More Recipes
टिप्पण्या (2)