मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोमोड आलेली मटकी
  2. 1मोठा बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 2-3 टेबलस्पूनतेल
  5. 7-8 पाने कढीपत्ता
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 2 टेबलस्पूनवाटलेला गोडा मसाला
  13. थोडीशी चिरलेली कोथिंबीर
  14. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    मोड आलेली मटकी निवडून व स्वच्छ धुऊन घ्यावी. कढई गॅसवर ठेवून त्यात तेल सोडावे व ते गरम झाले की त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडली की त्यात जीरे, कडिपत्ता व हिंग घालावा नंतर त्यात चिरलेला कांदा घालावा

  2. 2

    कांदा सोनेरी झाला की त्यात टोमॅटो घालावा, टोमॅटो थोडा नरम झाला की त्यात गोडा मसाला घालावा तसेच हळद मीठ तिखट गरम मसाला हे घालून घ्यावे आणि मग मिश्रण परतून घ्यावे

  3. 3

    वरील मसाला परतून झाला की त्यात मटकी घालावी. आता मटकी सुद्धा मसाल्यात परतून घ्यावी व त्या कढईवर झाकण ठेवून झाकणावर थोडेसे पाणी सोडून मटकी शिजू द्यावी पाणी लागल्यास झाकणा वरचे पाणी थोडे-थोडे करून मटकीत घालून मटकी शिजू द्यावी. आता मटकी शिजली की त्यात चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा

  4. 4

    तयार झाली आपली मटकीची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

Top Search in

Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes