उपवासाचे पौष्टीक लाडु (upvasache paushtik ladoo recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

#gpr
गुरू ब्रम्हा गुरू विष्णु गुरु देवो नमोस्तुते साखर गुळन घालता केलेले पौष्टीकलाडु हे लाडु मधे आपण खजुर, बदाम, शेंगदाणे वापरुन केलेत. रोज 2 खजुर तुपात भिजवून खाल्यावर तुमचे हिमोग्लोबिन चांगले वाढते. खजुरच्या नियमित सेवनाने Bp control मधे राहतो तुमची स्कीन ग्लो करते व केसाच्या समस्या ही कमी होतात. उपासा दिवशी किंवा इतर ही वेळी जर तुम्ही 1जरी लाडु सकाळी खाल्लातर यांचे खुप फायदे शरीराला होतात. ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली आहे आई हा आपला सर्वात पहिला गुरु आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज प्रत्येकी 2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीशेंगदाणे कुट
  2. 1 वाटीखोबरेखिस
  3. 1 वाटीखजुर
  4. 15-16बदाम
  5. 3 टेबलस्पूनसाजुक तुप
  6. 2 टेबलस्पूनखसखस
  7. 1 टीस्पूनजायफळ पुड
  8. 30 ग्रॅमखायचा डिंक
  9. वेलचीपूड आवडीने

कुकिंग सूचना

50 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला सर्व साहित्य घेणे

  2. 2

    खजुरचे बी काढुन मिकसरला बारीक करून घेयची आहे. खोबरयाचा खिस करुन घेणे.

  3. 3

    सुरवातीला खसखस भाजुन घेयची

  4. 4

    त्याच पॅन मधे खोबरयाचा खिस गुलाबी रंगावर भाजणे व ताटात काढुन ठेवणे.
    बदामाची भरड करुन घेणे

  5. 5

    2 चमचे तुप पॅन मधे घालून डिंक तळुण घेणे

  6. 6

    डिंक तळुण काढल्या वर त्याच पॅन मधे 1चमचा तुप घालून बदामाची भरड व खजुर भाजुन घेणे 2-3 मिनिटे

  7. 7

    त्यामधे अत्ता खोबरेखिस हाताने बारीक करुन घालायचा व शेंगदाणे कुट हे सुरवातीला बघत बघत मिक्स करुन घेणे.

  8. 8

    त्यामधे 1टीस्पून खसखस, तळलेला डिंक बारीक करून, जायफळपुड, वेलचीपूड घालून एकत्र करून घेणे

  9. 9

    सर्व 5-7 मिनिटे परतणे व थंड करायला ठेवणे
    कोमट असताना त्यात पिस्ता काप घालून त्याचे लाडु वळणे वरुन खसखस लावुन परत प्रेस करणे.

  10. 10

    अश्या प्रकारे उपवासाचे पौष्टिक लाडु तयार
    तेवढया साहित्यात 12-13लाडु तयार होतात

  11. 11

    हे साधारण 7-8 दिवस टिकतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes