ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#cpm7
झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही.

ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)

#cpm7
झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3-4 उत्तपम
  1. 4ब्रेड स्लाइस
  2. 1/4 कपरवा
  3. 1 टेबलस्पूनतांदूळाचे पीठ
  4. 3 टेबलस्पूनदही
  5. 1/2 कपपाणी
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 कपबारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर
  8. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    ब्रेड स्लाइसचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यात रवा तांदूळाचे पीठ दही मीठ घालून मिक्स करावे आणि 10 मिनिटे बाजूला ठेवावे.

  2. 2

    थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकत्र फिरवून घ्या आणि भांड्यात काढून घ्या.कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर बारीक चिरून थोडे मीठ घालून एकत्र करावे.

  3. 3

    तवा गरम करून त्यात उत्तपम घालावा चिरलेला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून हलकेसे उलटण्याने प्रेस करावे आणि झाकण ठेवून 2 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे.

  4. 4

    बाजूनी तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्या आणि तयार ब्रेड उत्तपम चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes