इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी (instant basundi recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#rbr
रक्षाबंधन स्पेशल रेसिपीजमध्ये मी माझ्या भावाला आवडणारी बासुंदी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे.
लहानपणी जेव्हा घरी बासुंदी पुरी भाजी जेवण असल्यावर पुरी भाजी बरोबर खाऊन बासुंदीची वाटी फ्रीजमध्ये ठेवून नंतर मलाई कुल्फी करयाची ही आयडिया मला तर माझ्या लहान भावाकडून मिळाली त्याचाच उपयोग करून मी ही रेसिपी केली आहे चला तर मग बघू इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी कशी करायची

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 500 एम.एलएव्हॅप्युरेटेड मिल्क
  2. 250 एम.एल कंडेन्स मिल्क
  3. 10-12पिस्ता काप
  4. 1/2 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    Evaporated milk /एव्हॅप्युरेटेड मिल्क Condensed milk / कंडेन्स मिल्क एकत्र मिक्स करून घ्यावे.पिस्ता काप करून यात घालावेत.

  2. 2

    मध्यम आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात उकळत ठेवावे अधूनमधून ढवळावे जेणेकरून खाली लागणार नाही आणि ऊतू जाणार नाही 1/2 तासानी वेलची पावडर घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करावा.

  3. 3

    तयार बासुंदी थोडी थंड झाल्यावर सर्व्ह करावी आणि जर मलाई कुल्फी करायची असेल तर डब्यात घालून अल्युमिनियम फाॅईल लावून झाकण लावून 6-7 फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes