कोहळयाची खीर (kohlyachi kheer recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#rbr
श्रावण शेफ वीक २
भरपूर वेळा बहीण भावांची आवड-निवड वेगवेगळी असते. पण आधीची परिस्थिती काहीशी अशी होती की आई बाबा जे म्हणतील ते... घरात जे उपलब्ध असेल त्यातच कमीत कमी खर्चात आई सण करायची. त्यातील आम्हा चारही भावंडाना आवडणारा पदार्थ म्हणजेच खीर पुरी.... अगदी पोटभर आणि आवडीने खायचो आम्ही लहानपणी... आता एवढे पदार्थ असतात... की कोहळयाची खीर वर्ष भरातून एखादे वेळेसच होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 500 ग्रामलाल कोहळे
  2. 200 ग्रामसाखर
  3. 4 टेबलस्पूनतांदुळ
  4. 1/2 लिटरआटवलेले दुध
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. ड्राय फ्रूट, चारोळी आवडीनुसार
  7. 1 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम कोहळे स्वच्छ धुवून त्याची साल काढून छोट्या छोट्या फोडीत कापून घेतले. तांदुळ धुवून घेतले.

  2. 2

    आता एका कूकर मध्ये कोहळे आणि तांदुळ एकत्र करून घेतले.1 ग्लास पाणी घालून 2 सीट्टया येऊ दिल्या.

  3. 3

    कूकर थंड झाल्यावर रवीने घोळून घेतले. आणि मंद आचेवर ठेवून दिले. त्यात आता साखर घालून 10 मिनिटे पाकास येऊ दिले. पाकास आल्यावर त्यात दुध आणि तूप घालून 2 उकळ्या फुटू द्याव्या.

  4. 4

    उकळी आल्यावर त्यात ड्राय फ्रूट आणि वेलची पुड घालावे. आणि मिक्स करून घ्यावी. आता आपली कोहळयाची खीर तयार आहे.

  5. 5

    गरम गरम पुरीसोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes