श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#shr
श्रावण रेसिपीस चॅलेंज week 3
'श्रावण' महिना म्हणजे उपवास, व्रतवैकल्यांचा महिना. सणांची सुरुवात. या महिन्यात सगळीकडे हिरवेगार असते. सगळीकडे आल्हाददायक वातावरण. श्रावणातच वेगवेगळ्या गावरान भाज्यांचीही रेलचेल असते. घराच्या परसदारात केलेला भाजीपाला या दिवसात मुबलक प्रमाणात असतो. त्यातीलच हा 'श्रावणी घेवडा'. तसा घेवडा बाराही महिना बाजारात मिळतो पण हा घेवडा श्रावणातच येत असावा म्हणूनच त्याला श्रावणी घेवडा म्हणत असावे. तर बघूया या श्रावणी घेवड्याची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 लोकांकरीत
  1. 1/4 किलोश्रावणी घेवडा
  2. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  3. 1 टेबलस्पूनवाटलेले एकत्रित लसूण खोबरे
  4. 1-1/2 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचे कुट
  5. फोडणीसाठी -
  6. तेल
  7. ½ टीस्पूनजीरे
  8. 1/4 टीस्पून हळद
  9. मीठ

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    घेवड्याच्या शेंगांचे देठ व शीरा काढून स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्यानंतर बारीक मोडून किंवा चिरून घ्याव्यात.

  2. 2

    कढईत दोन ते तीन चमचे तेल गरम करून जीरे फोडणीला घालावेत. जीरे तडतडले की मग त्यावर मोडलेल्या घेवड्याच्या शेंगा घालाव्यात. त्यातच हळद, काळा मसाला, चवीनुसार मीठ घालून चांगले परतावे. त्यानंतर झाकण झाकून एक वाफ आणावी.

  3. 3

    एक वाफ काढल्यानंतर शेंगदाण्याचे कुट, वाटलेले लसूण खोबरे घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून पाच मिनिटे शिजू दयावी. भाजी शिजल्याची खात्री करून गॅस बंद करावा. तयार 'श्रावणी घेवड्याची भाजी ' भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes