मुंबई चा बटाटा वडा (mumbai batata vada recipe in marathi)

Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar

मुलांच्या आवडता संध्याकाळचा नाश्ता

मुंबई चा बटाटा वडा (mumbai batata vada recipe in marathi)

मुलांच्या आवडता संध्याकाळचा नाश्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
2 लोक
  1. 6मध्यम आकाराचे बटाटे
  2. ८-९ लसूण पाकळ्या
  3. १/२ इंच आलं
  4. कोथिंबीर
  5. ७-८मिरच्या तिखट
  6. हळद
  7. कढीपत्ता
  8. मीठ
  9. चण्याच्या डाळीचे पीठ
  10. ओवा
  11. तेल
  12. मोहरी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून कुस्करून घ्यावे, त्यावर मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी, छोट्या कढईत तेल गरम करून लसूण ठेचून त्यात टाकावा एकीकडे मिरच्या आलं मिक्सर मधून जाडसर वाटून ते सुद्धा त्यावर टाकावे मग त्यावर हिंग मोहरी टाकून तडतडु द्यावे सर्वात शेवटी कढीपत्ता हळद घालावी व गॅस बंद करावा, तयार फोडणी बटाट्यावर घालून मिश्रण एकजीव करावे, त्याचे छोटे गोळे करून बाजूला ठेवाव.

  2. 2

    दुसऱ्या भांड्यात डाळीचे पीठ मीठ चवीनुसार ओवा पाव चमचा व थोडी हळद घालून एकत्र करावे, एकीकडे तेल तापवून घ्यावे व बटाट्याचे गोळे डाळीच्या पिठात घालून त्याचे आवरण करून तेलात सोडावे मध्यम आचेवर टाळून घ्यावे. गरमागरम वडे तय्यार कोणत्याही चटणी बरोबर अथवा सॉस बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रोजी
For me cooking is my stress buster... it's meditation
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes