कॅरामलाईज्ड शेवया खीर (caramalized sevya kheer recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#gur
आपण साधी शेवयाची खीर करतो पण आज थोडी वेगळी चव आणण्यासाठी मी साखरेचे कॅरमेल करून ते दुधात विरघळवल आणि ते खिरीत घातलं त्यामुळे कॅरामेलची मस्त चव खिरीला आली. वेगळी चव म्हणून सर्वांना खूपच आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ जण
  1. 5 टेबलस्पूनसाखर
  2. 1 वाटीवर्मिसिली शेवया
  3. 1 टेबलस्पूनतूप
  4. 1/2 लिटरदुध
  5. वेलचीपूड
  6. ड्रायफ्रूट्स आवडीनुसार
  7. 1 वाटीपाणी

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम पॅन मध्ये साखर घाला त्यावर अर्धा चमचा पाणी घाला व मंद गॅसवर कॅरामेल होऊ द्या थोडासा रंग बदलायला लागला की सतत ढवळा. रंग ब्राउन झाला की त्यात दूध घाला व कॅरामेल पूर्णपणे वितळू द्या.

  2. 2

    दुसरीकडे भांड्यात तुपावर शेवया लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. भाजल्या की त्यात पाणी व चिमूटभर मीठ टाकून झाकण ठेवून ५ मिनिट शिजू द्या.

  3. 3

    शेवया शिजल्या की त्यात वरील कॅरामलाईज्ड दूध घाला. ड्रायफ्रूट्स व वेलचीपूड घालून एक उकळी येऊ द्या.

  4. 4

    उकळी आली की गॅस बंद करा. एका बाऊलमध्ये काढून त्यावर पिस्त्याचे काप घाला आपली कॅरामलाईज्ड शेवया खीर खायला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes