झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#ccs
कुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी.....

झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)

#ccs
कुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमसूर
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2-3 टेबलस्पून आले
  5. मिरची
  6. कोथिंबीर
  7. जीरे
  8. लसुण वाटलेले
  9. 1/2 चमचाजीरे
  10. मोहरी
  11. 5-6 कढीपत्याची पाने
  12. 1.5 चमचा तिखट
  13. 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसुण मसाला
  14. 1/2 चमचाहळद
  15. मीठ चविनुसार
  16. तेल आवश्यकतेनुसार
  17. कोथिंबीर
  18. 1 चमचाधने पूड

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    प्रथम मसूर रात्रभर पाण्यात भिजवुन घ्या.सकाळी पाणी काढुन घ्या.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी घाला,तडतडले कीहिंग,कढीपत्ता घाला.मग आले,मिरची कोथिंबीरीचे वाटण घाला.छान परतुन घ्या.कांदा,टोमॅटो घालुन छान परता.

  3. 3

    आता या मधे हळद,तिखट,कोल्हापुरी कांदा लसुण मसाला,धने पुड घाला.छान तेल सुटु द्या.

  4. 4

    आता या मधे मसूर घाला.आवश्यक तेवढे पाणी घाला.चविनुसार मीठ घाला आणि वर झाकणी ठेवुन मसुर छान शिजु द्या.

  5. 5

    आता आपला झणझणीत अख्खा मसूर तयार आहे.मस्त वरुन कोथिंबीर घाला.आणि गरम गरम मसूर भाजी,भाकरी किंवा परोठ्याबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes