उपवासाचे डोसे (Upwasache dose recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#महाशिवरात्री विशेष

उपवासाचे डोसे (Upwasache dose recipe in marathi)

#महाशिवरात्री विशेष

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीभगर/ वरई
  2. 1 वाटीसाबुदाणा
  3. मीठ चवीनुसार
  4. पाणी गरजेनुसार
  5. तेल/तूप डोसे भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम भगर व साबुदाणा निवडून घ्या मग भरपूर पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या व थोडं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा व सकाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या मग डोस्याचे पीठ 30 मिनिटे तसेच झाकून ठेवा व डोसे तयार करायला घ्या तेव्हा पिठ 5 मिनिटे चांगलं फेटून घ्या म्हणजे डोसे छान मऊ होतात,आता डोस्याच्या पिठात चवीनुसार मीठ घाला मग नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा तवा गरम झाला की त्यावर मिठाचे पाणी शिंपडा

  2. 2

    मिठाचे पाणी कापडाने पुसून घ्या,मग 1 पळी डोस्याचे पिठ तव्यावर घालून पसरवून घ्या मग पलटी करून डोसा दुसऱ्या बाजूला देखील भाजून घ्या,डोसे भाजताना तेल किंवा तूप सोडा

  3. 3

    मग तयार गरमागरम डोसे उपवासाच्या बटाटा भाजी व उपवासाच्या चटणी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes