जामूनी बिर्याणी (Jamuni biryani recipe in marathi)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण ४०-४५ मिनिटे
४-५ जणांना
  1. १५-१७सुपारी इतके तळलेले गुलाबजाम साधारण
  2. बिर्याणी भातासाठी :
  3. 2 वाट्याबासमती तांदूळ
  4. थोडे खडे मसाले
  5. थोडे मीठ
  6. पाणी
  7. ग्रेव्हीसाठी :
  8. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  9. 1मोठ्ठा टोमॅटो बारीक चिरून
  10. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  11. 1 छोटाबटाटा चौकोनी तुकडे करून
  12. 1 छोटा चमचाआलं-लसूण पेस्ट
  13. 2छोटे चमचे तेल
  14. हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ
  15. बिर्याणी लेयरिंग साठी: :
  16. 1मोठ्ठा कांदा पातळ स्लाईसेस् करून
  17. 1मोठ्ठा टोमॅटो बारीक चिरून
  18. थोडी कोथिंबीर बारीक चिरून
  19. थोडा पुदिना बारीक चिरून
  20. 2मोठ्ठे चमचे बिर्याणी मसाला
  21. थोड्या सुकवलेल्या गुलाब पाकळ्या (ऐच्छिक)
  22. 1मोठ्ठा चमचा तेल
  23. 1मोठ्ठा चमचा तूप

कुकिंग सूचना

साधारण ४०-४५ मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी गुलाबजाम तळून बाजूला ठेवावे.

  2. 2

    बिर्याणी साठी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात खडे मसाले आणि थोडंसं मीठ घालून उकळी आल्यावर धुवून निथळलेले तांदूळ रोवावे. ८०% तांदूळ शिजल्यावर पाणी ओतून तयार भात निथळत ठेवावा.

  3. 3

    नंतर ग्रेव्हीसाठी, एका कढल्यात तेल तापवून जिरं, मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालून परतावे. थोडं तेल सुटल्यावर हळद, लाल तिखट, बटाट्याचे तुकडे आणि मीठ घालून बटाटा शिजेल इतपतच पाण्याचा हबका मारावा. बटाटा शिजल्यावर गैस बंद करून गुलाबजाम घालून मिक्स करावे आणि झाकून ठेवावे.
    * टीप : गुलाबजाम आपल्याला शिजवायचे नाहीत. त्यामुळे, गैस बंद करून ग्रेव्ही थोडी कोमट झाल्यावरच ग्रेव्हीमध्ये जामून मिक्स करावे.

  4. 4

    आता, एका जाड बुडाच्या पातेल्यात, सगळ्यात आधी तेल घालून त्यावर कांदा पसरवून घ्यावा. मग तयार भात, त्यावर तयार ग्रेव्ही, कोथिंबीर+पुदिना, टोमॅटो, बिर्याणी मसाला अशा लेयर्समध्ये बिर्याणी सेट करावी. सर्वात वर थोड्या सुकवलेल्या गुलाब पाकळ्या भुरभुराव्या आणि बिर्याणी ला १५ मिनिटे दणदणीत दम द्यावा.
    *टीप : गुलाबजाम कुस्करण्याची भिती असल्याने ग्रेव्ही अलगद हाताने पसरवावी.

  5. 5

    हलक्या हाताने बिर्याणी प्लेटमध्ये काढून रायता किंवा कोशिंबीर सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
शर्वरी पवार - भोसले
रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

Similar Recipes