तांदुळ पिठीची उकड (Tandul pithichi ukad recipe in marathi)

anita kindlekar
anita kindlekar @anita_9

तांदुळ पीठाची उकड ही पारंपरिक रेसिपी आहे. खास करुन कोकणात करतात. नाश्त्याला काय करावं असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी तांदुळ पीठाची उकड करावी. अगदी पटकन, चविष्ठ आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे.

तांदुळ पिठीची उकड (Tandul pithichi ukad recipe in marathi)

तांदुळ पीठाची उकड ही पारंपरिक रेसिपी आहे. खास करुन कोकणात करतात. नाश्त्याला काय करावं असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी तांदुळ पीठाची उकड करावी. अगदी पटकन, चविष्ठ आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनीटे
चार जणांसाठी
  1. 1 कपतांदूळ पीठ
  2. 1 कपपाणी
  3. 1 कपआंबट ताक
  4. 4-5हिरव्या मिरच्या
  5. 5-6कडीपत्त्याची पाने
  6. वाटीभर चिरलेली कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनआले बारीक चिरून
  8. 1 टेबलस्पूनसाखर
  9. फोडणीसाठी तेल मोहरी जीरे हिंग हळद
  10. मीठ चवीनुसार
  11. 2 चमचेतुप

कुकिंग सूचना

पंधरा मिनीटे
  1. 1

    मंद आचेवर कढई ठेवून फोडणीचे साहित्य वापरून खमंग फोडणी करा. आता त्याता ताक घाला.

  2. 2

    पाण्यात तांदुळाची पीठी भिजवून घेणे. लक्षात ठेवा त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.

  3. 3

    आता तांदुळाच्या पिठीचे मिश्रण कढईत घाला आणि छान परतून घ्या.आता चवीनुसार मीठ आणि साखर घालून व्यवस्थित एकजीव करा आणि झाकण ठेवून पाच सहा मिनिटे दणकून वाफा काढा. मधून मधून उकड परतत राहा म्हणजे ती खाली लागणार नाही आणि हळूहळू घट्ट होत जाईल. उकडीचा गोळा होत आला की गॅस बंद करून पाच मिनिट तशीच उकड मुरु द्या.

  4. 4

    तयार झाली आपली गरमागरम चविष्ट चटपटीत तांदूळ पिठाची ताकातली उकड. आता एका डिशमध्ये उकड घ्या आणि त्याच चमचा भर तूप घाला…वा वा त्यामुळे उकडीची चव द्विगुणीत होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
anita kindlekar
रोजी

Similar Recipes