काला (kaala recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#पश्चिम #महाराष्ट्र शिळ्या भाकरी उरल्या म्हणजे त्याचे काय करायचे ?? हा प्रश्न नेहमीच गृहिणींना पडतो .पटकन भरल्या मिरचीचा काला करा .महाराष्ट्रात हा काला खूप प्रसिद्ध आहे. झटपट व चटपटीत काला करून तरी पहा

काला (kaala recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र शिळ्या भाकरी उरल्या म्हणजे त्याचे काय करायचे ?? हा प्रश्न नेहमीच गृहिणींना पडतो .पटकन भरल्या मिरचीचा काला करा .महाराष्ट्रात हा काला खूप प्रसिद्ध आहे. झटपट व चटपटीत काला करून तरी पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
1 सर्व्हिंग
  1. 1भाकरी
  2. 100 ग्रॅम दही
  3. 1 टेबलस्पूनताक
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. 1कांदा लहान
  7. 1भरली मिरची
  8. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1/2 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    एक मध्यम आकाराची व मध्यम जाडीची शिळी भाकरी घ्या. ती बारीक कुस्करून, त्यांत 50 मिलिलिटर दही टाका.1 टेबलस्पून ताक टाका. त्यांतच मीठ व साखर टाकून, मिश्रण छान मिक्स करा. दही हवं तसं वरून टाकत जा.

  2. 2

    गॅसवर तेलाची फोडणी ठेवा. त्यांत मोहरी, जीरे टाका. तडतडल्यावर, भरली मिरची टाकून गॅस बंद करा.

    आता कालवलेल्या दही भाकरीच्या मिश्रणावर ती फोडणी टाका
    हलक्या हाताने कालवून, आणखी हवं तसं दही टाका. वरून कोथिंबीर व बारीक चिरलेला कांदा पेरा. लगेच सर्व्ह करू शकता. आवडीप्रमाणे फरसाण किंवा बारीक शेव सुद्धा पेरू शकता. काल्याची लज्जत आणखी वाढेल. भरल्या मिरचीचा एक वेगळाच स्वाद येतो
    ‌काला लगेचंच खा, म्हणजे तो आळणार नाही. जर काला आळला असेल तर त्यांत थोडेसे दही मिक्स करा व काल्याची मज्जा लुटा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes