चमचमीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

चमचमीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
५ जणांसाठी
  1. 12वडीच्या अळूची पाने
  2. 250 ग्रॅमबेसन पीठ
  3. 2 टे. स्पून तांदळाचे पीठ
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 2 1/2 टे. स्पून संडे मसाला
  6. 1 टी स्पूनगरम मसाला पूड
  7. 1 टीस्पूनगोडा मसाला
  8. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  9. 3 टे. स्पून चिंचेचा कोळ
  10. 2 टीस्पूनगूळ
  11. चवीनुसारमीठ
  12. वड्या तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    प्रथम अळूची पान स्वच्छ धुवून पुसून घेतली व लाटण्याने त्याच्या शिरा मोडून घेतल्या. नंतर त्यावर चिंचेचा रस लावला.

  2. 2

    एका भांड्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, संडे मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, धणे जीरे पावडर, चिंचेचा कोळ, गूळ,मीठ ह्यामधे पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट बनवून घेतली.

  3. 3

    एका पानाला ही पेस्ट लावून त्यावर उलट्या बाजूने दुसरे पान त्यावर पेस्ट अशारितीने आठ पाने लावून नंतर दोन बाजूने पाने दुमडून त्याची गुंडाळी करून घेतली.

  4. 4

    नंतर हे तयार झालेले उंडे कुकरमधे दोन शिट्ट्या काढून वाफवून घेतले.

  5. 5

    थंड झाल्यावर सुरीने छान वड्या कापून घेतल्या व तव्यावर तेल सोडून दोनही बाजूने छान कुरकुरीत शॅलो फ्राय केल्या व खमंग कुरकुरीत अळू वड्या सगळ्यांना खाऊ घातल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes